AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: युवक प्रतिष्ठान हा काळा पैसा पांढरा करणारा ‘उद्योग’, ईडीकडे सर्व माहिती देणार; राऊतांच्या आरोपाने सोमय्यांची कोंडी?

Sanjay Raut: किरीट सोमय्या हे स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात.

Sanjay Raut: युवक प्रतिष्ठान हा काळा पैसा पांढरा करणारा 'उद्योग', ईडीकडे सर्व माहिती देणार; राऊतांच्या आरोपाने सोमय्यांची कोंडी?
राऊतांच्या आरोपाने सोमय्यांची कोंडी?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 10:56 AM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शेअर मार्केटमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल (motilal oswal) ही कंपनी ईडीच्या फेऱ्यात आली होती. या कंपनीची चौकशी व्हावी म्हणून सोमय्यांनी आकांडतांडव केलं होतं. या कंपनीच्या कार्यालयातही सोमय्या गेले होते. तसेच कंपनीच्या शिपायांच्या घरीही सोमय्या गेले होते. त्यानंतर या कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी कशी मिळाली? असा सवाल करतानाच ईडीने या कंपनीची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. हा ईडीच्या अख्त्यारीत प्रश्न आहे. त्यामुळे ईडीने चौकशी केली पाहिजे. आम्ही ईडीला याबाबतची सर्व माहिती देऊ, असं सांगतानाच सोमय्याची युवक प्रतिष्ठान ही काळा पैसा पांढरा करणारी संस्था आहे, असा आरोपही त्यांनी केला. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

किरीट सोमय्या हे स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. मोतीलाल ओसवाल आणि कंपनी ही शेअर बाजारातील एक मोठी कंपनी आहे. एनसीएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळा झाला होता. त्यात या कंपनीचं नाव आलं. या कंपनीची चौकशी करा म्हणून सोमय्याने आकांडतांडव केलं. स्वत: त्यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या शिपयांच्या घरी गेले. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला त्यानंतर मोतीलाल ओसवालकडून लाखोंच्या देणगी दिल्या गेल्या. सध्या मला त्याबाबतचे दोन चेक मला मिळाले आहेत. तुम्ही भ्रष्टाचाराच्या कोणत्या लढाया लढत आहात? या घोटाळ्याशी तुमचा संबंध आहे असं आम्ही म्हटलं तर तुमचं काय उत्तर आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

क्या संबंध है? कहाँ से आया पैसा?

गेल्या तीन चार दिवसांपासून मी एक प्रकरण देतोय. त्यावर एकही खुलासा नाही. युवक प्रतिष्ठान हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग आहे. मुंबईतील बिल्डर आणि व्यापारी विशेषत: ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया आहेत अशांना ब्लॅकमेल करून सोमय्या लाखो, कोट्यवधी रुपये गोळा करतात. युवक प्रतिष्ठानच्या नावाने चेक घेतात. कॅशही घेतात असं सांगतात. याची चौकशी होणार आहे. धर्मादाय आयुक्त आणि आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी होणार आहे. त्यानंतर याची माहिती आम्ही ईडीला देणार आहोत. कारण यात ईडीचा थेट संबंध आहे. ईडीने कारवाया केलेल्या कंपन्यांकडून त्याने पैसे कसे घेतले. त्याच्या लिंक्स काय आहेत. किरीट सोमय्यांचा नेहमी विचारतात ना, क्या संबंध है, कहाँ से आया पैसा? तसंच आम्ही विचारत आहोत, तुमचा संबंध काय? कुठून आला पैसा? असा सवाल राऊत यांनी केला.

त्यांचा खेळ संपलाय

तुमच्या खात्यात पैसे कसे आले हा तपास यंत्रणांचा भाग आहे. सोमय्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात कसं काम करतंय हे दिसून येतंय. त्यांच्याच हातात सूत्रं आहे आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार? यांच्या तोंडाला शेणाचा वास हे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेत आहेत. यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येतील. सुरुवात या लोकांनी केली होती आता शेवट आम्ही करतोय. फक्त सोमय्यांचं एकट्याचं प्रकरण नाही. भाजपच्या 28 लोकांचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.