AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 800 कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्याचा टाकला बॉम्बगोळा

Sanjay Raut big Statement : राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असतानाच त्यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे.

Sanjay Raut : चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 800 कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्याचा टाकला बॉम्बगोळा
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोटImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2025 | 10:53 AM
Share

राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंत्र्यांच्या अशा कारभाराचा भाग आता मुख्यमंत्र्यांना झेपत नाही, पेलावत नाही, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार असल्याचा दावा राऊतांनी केला. तर दुसरीकडे त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. या नव्या आरोपांनी राजकीय वर्तुळात धुराळा उडवून दिला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत?

कोण आहेत ते चार मंत्री

आपण गेल्या काही दिवसांपासून या मंत्रिमंडळातील चार मंत्री जाणार असल्याचे सांगत आहे. संजय शिरसाठ, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल. संपूर्ण मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे, हे ओझे देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलिकडं गेलं आहे. हे ओझं पेलवतं नाही पण ते फेकता ही येत नाही. खरतंर त्यांचं 137 चं संख्याबळ आहे. त्यांना अशाप्रकारे ओझ्याने वाकून जाण्याची गरज नाही. ते वाकले असले तरी ते त्यांचे काम करत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

800 कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्याचा बॉम्बगोळा

या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी 800 कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्याचा बॉम्बगोळा टाकला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तींयाकडे बोट दाखवले. त्यांच्या या बॉम्बगोळ्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी या घोटाळ्याचे झारखंड कनेक्शन काय आहे यावर भाष्य केले.

काल झारखंड येथून एक पथक आले. तिथल्या एसीबीचं हे पथकं होतं. त्यांनी अमित साळुंके या व्यक्तीला अटक केली. सुमित फॅसेलिटीजचे नाव त्यात समोर येत आहे. राज्यात 800 कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा झाला. 100-200 कोटींचे टेंडर 800 कोटींवर नेण्यात आले. 650 कोटींनी टेंडर वाढवण्यात आले. सुमीत फॅसेलिटीज, 108 नंबर ॲम्बुलन्स, तुम्हाला आठवते का? तर त्याचे सूत्रधार हे अमित साळुंके आहेत. हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन आहे. त्याचा कणा हा अमित साळुंके असल्याचा दावा राऊतांनी यावेळी केला. झारखंड मद्य घोटाळ्यात हे पथक येथे आले आणि अमित साळुंके याला अटक केली. ॲम्बुलन्स घोटाळ्यातील पैसा शिंदेकडे वळवला की त्याला इतरत्र पाय फुटले याचा तपास होणार आहे. ही अटक सहज झालेली नाही, यावर राऊतांनी जोर दिला. या ॲम्बुलन्स आणि मद्य घोटाळ्याची पाळंमुळं शोधण्यात येणार आहे. त्याचे राज्याच्या मंत्रिमंडळाशी कनेक्शन समोर येत आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला, निवडणुकीसाठी त्याचा कसा वापर झाला हे समोर येणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना मंत्रिमंडळाची साफसफाई करावी लागेल, असा दावा राऊतांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.