AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : हिंमत असेल तर…विधानसभेपूर्वीच राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना असे डिवचले

Sanjay Raut CM Eknath Shinde : लोकसभा निवडणूक 2024 मधील राज्यातील यशानंतर चित्र पालटले आहे. उद्धव ठाकरे गटाने काँग्रेस पाठोपाठ मोठा विजय मिळवला. विधानसभेपूर्वीच राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना असे डिवचले आहे.

Sanjay Raut : हिंमत असेल तर...विधानसभेपूर्वीच राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना असे डिवचले
संजय राऊतांची तुफान बॅटिंग
| Updated on: Jun 20, 2024 | 10:39 AM
Share

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. तर मोठ्या यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा खिशात घालण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासून नियोजन सुरु केले आहे. मागील काही चुका टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला डिवचण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचले आहे.

राऊतांची तुफान फटकेबाजी

शिवसेनाचा स्थापना दिन दोन्ही गटांनी साजरा केला. त्यावरुन दोघांनी एकमेकांवर टीकस्त्र सोडले आहे. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पुजण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणुक आयोग यांच्या देवघरात तसबीर ठेवून त्याची पुजा करण्याचा चिमटा पण त्यांनी शिंदे गटाला काढला.

हिंमत असेल तर चोरलेले धनुष्य बाण चिन्ह, पक्ष तुम्ही परत करा, मग निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले. त्या चिन्हाच्या आणि पक्षाच्या जोरावर त्यांना काही जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जर शिवसेनेचे चिन्ह असते तर लोकसभेत उद्धव ठाकरे गटाला 22 जागा मिळाल्या असत्या, असे ते म्हणाले.

चोरलेले चिन्ह, पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही. जनतेने त्यांना लोकसभेत चांगला धडा शिकविल्याचे राऊत म्हणाले. आता विधानसभेत पण महायुतीची वाताहत होणार आहे. जनता त्यांना जागा दाखवून देणार असल्याचे राऊत म्हणाले. सध्या भीतीमुळेच त्यांनी विधानसभेची आताच तयारी सुरु केल्याचे चिमटा त्यांनी काढला.

हिंमत असेल तर…

मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असले तर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. स्वतंत्र चिन्ह घ्यावं आणि विधानसभेच्या निवडणुकीत उतरावं असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आठवण काढली. या दोघांनी शिवसेना पक्ष अथवा चिन्ह चोरले नसल्याचे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्वतःच्या स्वतंत्र पक्षावर ताकद दाखविण्याचे आवाहन राऊतांनी यावेळी केले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.