Sanjay Raut : मराठीचा मुडदा कुणाच्या दबावामुळे? राऊतांचा तो मोठा गौप्यस्फोट; नागपूरकडे इशारा करत काय केला आरोप
Sanjay Raut on Hindi : राज्यात हिंदी सक्तीकरणाचा मुद्दा तापला आहे. शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी विषयीच्या धोरणावर विरोध एकवटले आहेत. तर मराठीचा मुडदा कुणाच्या दबावामुळे पाडण्यात येत आहे, याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut on RSS : राज्यात पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याचे धोरण अडचणीत आले आहे. राज्य सरकारने हा हिंदी सक्ती केली नसल्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात विरोध एकवटले आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदीविरोधी मोर्चात एकत्र दिसणार असल्याने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी हिंदी लादण्यामागे केवळ केंद्रातील नेत्यांचे डोके नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे हिदी सक्ती करण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
संघाच्या दबावामुळे हिंदी सक्ती
आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हिंदी सक्तीवरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचेवेळी संघाच्या भूमिकेवर तोंडसुख घेतले. भैय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मराठी ही मुंबईची भाषा नसल्याचे वक्तव्य केले होते. तेव्हापासून मराठी मुद्दा चांगलाच तापला आहे. तोच आधार घेत राज्य सरकारवर हिंदी धोरण लागू करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. केंद्र सरकारच्या दबावामुळेच फडणवीस सरकारने याविषयीचा अध्यादेश, GR काढल्याचा दावा त्यांनी केला. मराठीचा मुडदा पाडण्याचे काम सरकार त्या दबावामुळेच करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप उध्दव ठाकरेंच्या बाबतीत चुकीची विधाने करत आहे. भाजपकडून गैरसमज पसरवाणारी माहिती देण्यात येत आहे. समिती नेमणं गुन्हा आहे का? त्रिभाषा सक्तीचा निर्णय केंद्राने आमच्यावर लादला आहे.कोणताही अहवाल मुख्यमंत्री स्वीकारतात, तसे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अहवाल स्वीकारला. पण त्यांन GR काढला का? त्यांनी अध्यादेश काढला का, असा सवाल राऊतांनी विचारला. हा जीआर कोणी काढला. हिंदी विषयीचा अध्यादेश फडणवीस सरकारने काढला. हा अहवाल फडणवीसांनी जाहीर वाचावा, असे आवाहन त्यांनी केले. तर या जीआरची मोर्चामद्ये होळी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांचे मनोमिलन
5 तारखेच्या मोर्चाल शरद पवारांचा पाठिंबा आहे. माझे शरद पवारांशी बोलणं झाले आहे. मी येण्याचा प्रयत्न करेन असे पवारांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्ष सुध्दा मोर्चा सहभागी होणार आहे. दलित पँथर, शेकाप, डावे, अन्य काही संघठाना या मोर्चात सहभागी होणार आहेत. सर्व मराठी शक्तीचे एकत्रीकरण होईल. उद्याच्या मोर्चातून नक्कीच चांगलं काहीतरी घडले असे राऊत म्हणाले.
मुंबई पालिका निवडणूक मराठी शक्तींनी एकत्र लढावं अशी आमची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले. पूर्वी सेना आणि मनसेचे नेते एकमेकांना भेटत नव्हते. ते वाटा, रस्ते बदलत होते. आता ते एकमेकांना भेटत आहेत. चर्चा करत आहेत. मोर्चानंतर एक सकारात्मक वातावरण होईल. आता मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
