“जे स्वप्न मोदीनी पाहिले, ते स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री मोठ्या जोमाने काम करताहेत”; विरोधकांच्या आरोपांवर शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण दिले

संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांना सकाळचा रोज भोंगा वाजत ते सरकारवर टीका करत असतात. त्यांना वाटतं टीका केल्यानंतर आपण मोठे होऊ मात्र ते मोठे होत नाहीत तर त्यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी पसरत असते अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

जे स्वप्न मोदीनी पाहिले, ते स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री मोठ्या जोमाने काम करताहेत; विरोधकांच्या आरोपांवर शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण दिले
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 5:22 PM

मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून बीकेसी परिसरामध्ये बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टला सुरुवात झालेली आहे. मात्र त्यावरुन आता काही लोकं राजकारण करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईला तोडण्याचा डाव आहे किंवा जे सभेसाठी ग्राउंड होतं ते उद्ध्वस्त करणार अशा प्रकारची वल्गना करणार असल्याची टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे. यावेळी संजय शिरसाठी यांनी विरोधकांना उत्तर देताना म्हटले आहे की, देशात कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याचबरोबर मुंबईमध्ये येण्याचं स्वप्न सर्वांचं असतं आणि ते सुख सर्वाना झालं पाहिजे असं मतही संजय शिरसाठ यांनी व्यक्त केले आहे.

गुजरातहून दर एका तासाला मुंबईच्या दिशेने ट्रेन येत असते, कारण मुंबईचं आकर्षण कधीच कमी होणार नाही असं सांगत त्यांनी मुंबईचा गौरवही केला आहे.

मुंबईविषयी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही काही लोकांना बोंबलण्यासाठी आणि सभा घेण्यासाठी तो ग्राऊंड पाहिजे असा घणाघातही त्यांनी विरोधकांवर केला आहे.

ते अंडरग्राउंड जरी असलं वर यांना भाषण करण्यासाठी मोकळं आहे मात्र सर्वसामान्यांना जाण्या येण्यासाठी जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते स्वप्न साकारण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या जोमाने काम करत आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळी दाखवला.

नागपूर-विदर्भ अशा ठिकाणी येऊन ट्रेन सुरू झाल्या तर लोकांना त्याचा कितीतरी पटीने अधिक फायदा होणार असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले

फॉक्सक्वॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यावरूनही आमदार संजय शिरसाठ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

एक-दोन प्रकल्प इकडून तिकडे गेले तर चर्चा करण्याची आपल्याला सवय झालेली आहे मात्र प्रकल्प आणण्यासाठी कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन काम केले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कारण विकास महाराष्ट्राचा करायचा असेल तर एकत्र यायला काही हरकत नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर दुसरीकडे विरोधकांना त्यांनी सांगितले की, एकदा त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला आडवं कसं जायचं ही आपल्याकडचे नीती आहे असं म्हणत ठाकरे गट कामाच्या आडवा कसा येतो तेही त्यांनी या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.

संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करत त्यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांना सकाळचा रोज भोंगा वाजत ते सरकारवर टीका करत असतात. त्यांना वाटतं टीका केल्यानंतर आपण मोठे होऊ मात्र ते मोठे होत नाहीत तर त्यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी पसरत असते अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

यावेळी ते म्हणाले की सर्वसामान्या माणसांना त्यांच्या त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा जीव जातो, तुमचे असले बकवास ऐकण्यासाठी आता लोकांकडे कुठे वेळ आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.