AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाह हे त्यांचं आडनाव, ही क्राईम करून पळणारी लोकं’, संजय राऊत यांचा मुंबईतल्या प्रकरणावरुन थेट अमित शाह यांना टोला

संजय राऊत यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय. "वरळीतल्या घटनेतील आरोपीचं मिहिर शाह असं त्यांचं नाव आहे. शाह हे त्यांचं आडनाव हे क्राईम करून पळणारी लोकं आहेत", असं म्हणत संजय राऊतांनी मिहीर शाह याच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला.

'शाह हे त्यांचं आडनाव, ही क्राईम करून पळणारी लोकं', संजय राऊत यांचा मुंबईतल्या प्रकरणावरुन थेट अमित शाह यांना टोला
संजय राऊत आणि अमित शाह
| Updated on: Jul 07, 2024 | 9:00 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार अजय राय यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “100 टक्के मोदी आणि अमित शाह जास्त दिवस दिल्लीत राहणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले. “पुढच्या वेळी नरेंद्र मोदी वारणसीतून निवडणूक लढण्यासारखी परिस्थिती राहणार नाही. वाराणसीतून मोदी पुन्हा निवडणून येतील, असं वाटत नाही. एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याला भेटण्यासाठी आलेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

थेट अमित शाह यांना टोला

“शिंदेंचे लोक आज फरार होतात. उद्या शिंदेही फरार होईल. एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होईल. एक गुंडांची टोळी सरकार चालवत आहे. वरळीतल्या घटनेतील आरोपीचं मिहिर शाह असं त्यांचं नाव आहे. शाह हे त्यांचं आडनाव हे क्राईम करून पळणारी लोकं आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी मिहीर शाह याच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला.

वरळीत नेमकं काय घडलं?

वरळीत आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रदीप नाखवा (वय ५० वर्षे) हे त्यांच्या पत्नी कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांच्यासोबत त्यांच्या स्कुटीवरुन डॉ. अॅनी बेझंट रोड वरुन वरळी कोळीवाड्याकडे जात होते. या दरम्यान लॅन्डमार्क जीप शोरूम समोर, डॉ. अॅनी बेझंट रोड, येथे मागून येणाऱ्या बीएमडब्लु कारने त्यांच्या स्कुटीला मागून जोराची धडक दिली. कारचालक धडक देवूनच थांबला नाही. तर त्याने नाखवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडल्यानंतर ब्रेक दाबला. यानंतर हे दाम्पत्य गाडी खाली पडलं. यानंतर कारचालकाने महिलेच्या अंगावर गाडी चढवली. त्यानंतर त्याने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवसेनेचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्याचं नाव मिहीर शाह असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर आरोपी मिहीर शाह हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संजय राऊत यांनी आरोपीच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला आहे.

Follow Us
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.