Tauktae cyclone | मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये जय्यत तयारी, वेळ पडल्यास कोळीवाड्यातील नागरिकांना हलवणार

वेळ पडल्यास वरळी, माहिमसह इतर कोळीवाड्याजवळ राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. (Tauktae cyclone Mumbai Municipal system on high alert)

Tauktae cyclone | मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये जय्यत तयारी, वेळ पडल्यास कोळीवाड्यातील नागरिकांना हलवणार
Tauktae Cyclone bmc
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 12:00 PM

Tauktae cyclone मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत 15 आणि 16 मे रोजी पर्जन्यवृष्टीसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आली आहे. (Tauktae cyclone Mumbai Municipal system on high alert)

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार, अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ दिनांक 15 आणि 16 मे 2021 रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या अंतर्गत प्रामुख्याने धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिनाऱ्याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणा-या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवा, असे आदेश दिले आहेत. तसेच वेळ पडल्यास वरळी, माहिमसह इतर कोळीवाड्याजवळ राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यादरम्यान नागरिकांनी काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी. त्याचप्रकारे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असेही निर्देश पालिकेने दिले आहे.

मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये जय्यत तयारी

1. जंबो कोविड सेंटरसह इतर परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणीः कोविड बाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या जंबो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणा-या धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे.

2. भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, एन.एस.सी.आय. डोम, एम.एम.आर.डी.ए., बीकेसी जंबो, नेस्को जंबो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणा-या जंबो कोविड केंद्रांलगतच्या 384 झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.

3. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर ठिकाणी असणा-या धोकादायक झाडांची छाटणी देखील करण्यात येत आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे.

4. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारी असणा-या ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, त्या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवा-याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व 24 विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.

5. पाणी तुंबण्याच्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्थाः बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.

6. वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रातील ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलीसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

7. बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहे. या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना आणि सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.

8. वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात येत आहेत. (Tauktae cyclone Mumbai Municipal system on high alert)

संबंधित बातम्या : 

Tauktae Cyclone | मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी

Tauktae cyclone | येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, मुंबईसह इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

Tauktae cyclone | महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या ‘तोक्ते’चा अर्थ काय? कुणी दिलं हे नाव? कसं निर्माण झालं? वाचा एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.