Tauktae cyclone | महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या ‘तोक्ते’चा अर्थ काय? कुणी दिलं हे नाव? कसं निर्माण झालं? वाचा एका क्लिकवर

लक्ष्यद्वीपसह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यानंतर गेल्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले.

1/10
महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. यानंतर 2021 मधील पहिलं चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत आहे.
2/10
‘तौत्के’ असे या चक्रीवादळ नाव आहे. हे चक्रीवादळ दर तासाला अधिकाधिक सक्रीय होत आहे. तसेच त्याचा वेगही वाढू लागला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
3/10
लक्ष्यद्वीपसह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यानंतर गेल्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. तर काही परिसरात सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.
4/10
तौत्के हे चक्रीवादळ केरळ, गोवा, कोकण, मुंबईच्या समुद्रातून 18 मे रोजी मार्गक्रमण करेल. त्यानंतर ते भारतीय किनाऱ्याच्या समांतर उत्तरेकडे जाऊन गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ दाखल होईल. यादरम्यान भारतीय किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता नाही.
5/10
पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला तयारीचा आढावा
6/10
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे वादळ गुजरातच्या पश्चिम भागात किंवा पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात 18 मे रोजी संध्याकाळी किंवा रात्रीच्या दरम्यान धडकेल. यावेळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात उंचच उंच लाटा धडकतील. तसेच वाऱ्याचा वेगही खूप जास्त असेल.
7/10
अरबी समुद्रातील या चक्रीवादळला म्यानमारने तौत्के असे नाव दिले आहे. तौत्के या शब्दाचा अर्थ lizard किंवा छोटी पाल असा होता. यंदाच्या वर्षी भारतीय किनारपट्टी भागात धडकणारे हे पहिले चक्रीवादळ आहे.
8/10
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे.
9/10
या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
10/10
‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे.