AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक! पहाटे 4.15 वाजताच आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दीत ‘ठाकरे’चा शो

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला शो मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता सुरु झाला. मुंबईत कडाक्याची थंडी सुरु असतानाही, पहाटे पहाटे आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दी झाली. मनसे नेते अभिजीत पानसे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी […]

ऐतिहासिक! पहाटे 4.15 वाजताच आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दीत 'ठाकरे'चा शो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला शो मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता सुरु झाला. मुंबईत कडाक्याची थंडी सुरु असतानाही, पहाटे पहाटे आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दी झाली. मनसे नेते अभिजीत पानसे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची उत्सुकता अवघ्या मराठी जनांना आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताचा शो हाऊसफुल्ल होणार, हे ओघाने आलेच. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा शिवसेनेचे खासदार आणि बाळासाहेबांचे निटवर्तीय राहिलेले संजय राऊत यांनी सांभाळली आहेत. अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची अर्थात बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

साधारणपणे कुठल्याही सिनेमाचा पहिला शो सकाळी सात वाजता प्रदर्शित केला जातो. पण एखाद्या सिनेमाला पहाटे 4.15 ला प्रदर्शित करणे हे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे आयमॅक्समध्ये 4.15 ला ठाकरेचा शो सुरु झाल्याने, हे सुद्धा एक ऐतिहासिक आहे. आयमॅक्समध्ये ठाकरे सिनेमाच्या पहिल्या शोसाठी ढोल-ताशा वाजवण्यात आला. दिग्दर्शक अभिजीत पानसे सुद्धा या शोला उपस्थित होते. आपण सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीला फळ आता मिळेल. तसेच, सिनेमाच्या पहिल्या शोला बाळासाहेबांची छबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवधर यांनी देखील हजेरी लावली आहे.

देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

शिवसेना स्थापन होण्याचे आधीचे काही वर्षे, शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरचे काही वर्षे असा सुरुवातीचा पट या सिनेमातून मांडला जाणार आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांनी 60-70 च्या दशकात उठवलेला आवाज, पुढे हिंदुत्त्वाची धरलेली कास, दरम्यानच्या काळातली महत्त्वाची आंदोलने इत्यादी गोष्टी या सिनेमात असतील, असे एकंदरीत सिनेमाच्या ट्रेलरवरुन लक्षात येते. मात्र, सिनेमात नेमक्या कोणत्या घटना, प्रसंग दाखवण्यात आले आहेत, ते आता सिनेमा पाहिल्यावरच लक्षात येईल.

ठाकरे सिनेमा आणि वाद-चर्चा वगैरे

  1. ठाकरे सिनेमावरुन पहिली काहीशी नकारात्मक चर्चा सुरु झाली ती सिनेमात बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेल्या आवाजावरुन. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजावर अनेकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही नापसंती दर्शवली होती.
  2. संभाजी ब्रिगेड या संघटनेने ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची सिनेमात बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
  3. ठाकरे सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवरुन सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने मांडला. त्यानंतर ‘उठाव लुंग’ असे बदल या शब्दांमध्ये सिनेमात करण्यात आले.
  4. ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अर्ध्यातून निघून जाण्यावरुन नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. त्यावरुन 23 आणि 24 जानेवारीला उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, गर्दी असल्याने आपण माघारी गेलो, असे समजुतीचे स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आणि वाद मिटला.

संबंधित बातम्या :

‘ठाकरे’ वाद : काल पानसे अर्ध्यात निघून गेले, आज सेना-मनसे नेते जुंपले!

‘ठाकरे’चं स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून गेलेल्या दिग्दर्शक पानसेंची पहिली प्रतिक्रिया

‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात

ठाकरे सिनेमाची निर्मिती शिवसेनेकडून, पण सारथ्य मनसेकडे!

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे सिनेमा पहाटे 4 वाजता रिलीज होणार

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.