AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध; घरवापसीचा तो मोठा निर्णय, झोपडपट्टीमुक्त मुंबईसह अजून कोणते वचन? जाणून घ्या एका क्लिकवर

Mahayuti Manifesto: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. मुंबईकरांची मुंबईत घरवापसी, झोपडपट्टीमुक्त मुंबईसह अनेक वचनं महायुतीने मुंबईकरांना दिली आहे. काय काय आहे या जाहीरनाम्यात?

महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध; घरवापसीचा तो मोठा निर्णय, झोपडपट्टीमुक्त मुंबईसह अजून कोणते वचन? जाणून घ्या एका क्लिकवर
महायुती वचननामा, जाहीरनामाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 12:58 PM
Share

Devendra Fadnavis-Eknath Shinde: मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते हा वचननामा आज रविवारी,11 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. प्रचाराच्या तोफा थंडावत असताना मुंबईकरांवर महायुतीने आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. विविध विषयाला या वचननाम्यात हात घालण्यात आला आहे. काय दिले महायुतीने मुंबईकारांना महायुती?

मुंबईकरांसाठी महायुतीकडून काय काय वचन?

मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वचनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी अनेक योजना आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वचननाम्यातील सर्व हायलाईट्स मांडले. त्यानुसार, गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे. त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहे. एसआरए, म्हाडाच्या इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते. आम्ही पाच वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचं काम केलं आहे. मुंबई खड्डे मुक्त करणार आहोत. आम्ही फक्त मांडून थांबणार नाही. त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एसआरए आणि कलस्टरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. कलस्टरच्या माध्यमातून सुनियोजित मुंबईचा विकास करणार आहोत. १७ प्रकल्प हाती घेतले आहे. गिरणी कामगारांना हक्काचं घर देणार आहे. १२ हजार लोकांना आम्ही घरं दिलं आहे. अमित साटम यांना माहीत आहे. ते यात अग्रेसर होते. मुंबई आणि एमएमआरमध्ये घरे दिली. हक्काची घरे देण्याचं वचन दिलं आहे. मुंबईचा माणूस हद्दपार झाला आहे. त्यांना पुढे आणण्याचं काम करायचं आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठी माणसासाठी आश्वासनाचा पाऊस

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकारांना काय काय मिळणार याची घोषणा केली.काही वर्षात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांना हात घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात असा आत्मविश्वास मुंबईकरांमध्ये तयार केला आहे. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे वचननामा पूर्ण करू. पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा वचननाम्यावर आधारीत ॲक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीट म्हणून मांडू. काय केलं होतं हे सांगू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

डीम कनव्हेन्सचे विषय सोडले. जागा फ्रि होल्ड करण्याचं काम केलं. हाईटच्या समस्या सोडवल्या. भविष्यात याला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईत राहणारा मराठी माणूस काहीही झालं तरी मुंबई सोडून जाणार नाही. मुंबईतच त्याला घरं देऊ हा संकल्प घेतला आहे. बीडीडीचाळ पत्राचाळ, विशाल सह्याद्रीत हे करून दाखवलं आहे. काही लोकं केवळ मराठी माणसाच्या घराबद्दल बोलत असतात. आम्ही वचन करणारे आहेत. म्हाडाचे लेआऊट्समध्ये रिडेव्हल्पमेंट करताना अधिकची जागा देत आहोत. त्यात पारदर्शकता आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

धारावीसाठी काय?

धारावीचा विकास डीआरपी करणार आहे. शासन भागीदार आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला कमीत कमी साडे तीनशे स्क्वेअर फुटाचे घर देणार आहे. धारावीतील लघु उद्योग व्यवसायांना चांगल्या पद्धतीने इको सिस्टीम करून देणार आहे. धारावीतील अपात्रांना हायकोर्टाचे आदेश न मोडताना मार्ग काढून त्यांना घरं देणार आहोत. महापालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तो निर्णय बदलला होता. आम्ही पुन्हा निर्णय घेतला. महापालिकेतील सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणार आहोत. कौशल्य युक्त करणार आहोत. महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे त्यासाठी मराठी लँग्वेज लॅब करणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात महापालिकेने यापूर्वी चांगलं काम केलं. आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या केल्या. त्या अधिक चांगल्या करणार आहोत,  असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार.
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा.
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला.
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन.
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश.
वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल! शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल! शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.
सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळणार! महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?
सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळणार! महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?.
नागपूर बाहेरूनच चांगलं दिसतंय... प्रफुल्ल पटेलांचा भाजपला घरचा आहेर
नागपूर बाहेरूनच चांगलं दिसतंय... प्रफुल्ल पटेलांचा भाजपला घरचा आहेर.
बेस्ट बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देणार; शिंदेंचं आश्वासन
बेस्ट बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देणार; शिंदेंचं आश्वासन.
57 मधले 17 नगरसेवक पळून गेले! एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका
57 मधले 17 नगरसेवक पळून गेले! एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका.