Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभेच्या जागावाटपाचा महायुतीत आता कुठं तिढा?, पाहा व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीआधी महायुतीचं जागा वाटप 90 टक्के पूर्ण झालं असलं तरी अजूनही काही जागांचा तिढा सुटताना दिसत नाही. कोणत्या जागांवरुन फॉर्म्युल्याची घोषणा अडकलीय. कोणत्या जागा आहेत ज्यामुळे अजुनही बैठकांवर बैठक होत आहेत.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभेच्या जागावाटपाचा महायुतीत आता कुठं तिढा?, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:41 PM

दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही निघाली पण अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. नाशिकमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा आहे. बुलडाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी झाली, उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगलेत शिंदेंच्या शिवसेनेकडून धैर्यशील मानेंचा दावा आहे. तर रयत क्रांतीचे सदाभाऊ खोतही आग्रही आहेत. हिंगोलीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, मात्र भाजपसोबत रस्सीखेच सुरु आहे. धाराशीवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र भाजप इथून माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशींना तिकीट देण्यास इच्छुक आहे. सुरुवातीला नाशिकवरुन काय हालचाली सुरु आहेत, ते जाणून घ्या.

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनीही नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली. गोडसे आणि मंत्री दादा भुसेही वर्षावरच्या बैठकीत उपस्थित होते. मात्र नाशकात भाजपचे 3 आमदार असून भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळं भाजपच लढणार असं सांगून इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनी हेमंत गोडसेंना मदत करणार नसल्याचं म्हटलंय. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अचानक मंत्री भुजबळांचंही नाव समोर आलंय.

बुलडाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी झालीय. जागा आणि उमेदवारीचा फौसला होण्याआधीच शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांनी अर्जही दाखल केला. बुलडाण्यात प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटाचेच खासदार आहेत..मात्र महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जागा येणार की नाही. या शंकेनं गायकवाडांनी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ:-

हातकणंगलेच्या जागेवरुन शिंदेंची शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने पुन्हा कामाला लागलेत. त्यांनी मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शनही घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात असं धैर्यशील मानेंचं म्हणणंय. तर हातकणंगलेच्या जागेसाठी महायुतीतल्याच रयत क्रांतीचे सदाभाऊ खोतांनीही दावा केलाय. उमेदवारीसाठी सदाभाऊ खोतांनी फडणवीसांचीही भेट घेतली. दुसरीकडे भाजप पुरस्कृत आमदार प्रकाश आवाडेंचे चिरंजीव राहुल आवाडेही अपक्ष लढणार आहेत.

धाराशीवच्या जागेवरुनही तिढा कायम आहे. धाराशीवची जागा अजित पवार गटाकडे असली तरी या जागेसाठी भाजप आग्रही आहे. भाजप धाराशीवमधून माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशींना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपचेच आमदार राणा जगजीत सिंहांच्या हालचाली सुरु झाल्यात. राणा जगजित सिहांनी अजित पवारांचीही भेट घेतली आणि त्यानंतर फडणवीसांनाही भेटले. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंहच लढले होते. महायुतीच्या बैठकांवर बैठका झाल्यात. मात्र तिढा असलेल्या जागांचा पेच काही सुटत नाहीय.

Non Stop LIVE Update
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.