AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ते दिल्ली, ठाकरे गटाच्या गोटात प्रचंड हालचाली, Tv9 मराठीच्या हाती Exclusive माहिती

शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी (Thackeray Group) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण ठाकरे गटाच्या गोटात उद्या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं आहे.

मुंबई ते दिल्ली, ठाकरे गटाच्या गोटात प्रचंड हालचाली, Tv9 मराठीच्या हाती Exclusive माहिती
उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 22, 2023 | 9:13 PM
Share

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी (Thackeray Group) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण ठाकरे गटाच्या गोटात उद्या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं आहे. तसेच याच घडामोडींवर ठाकरे गटाचं भविष्यातील राजकारण अवलंबून राहणार आहे. ठाकरे गटात सध्या हालचालींना वेग आलाय. यातील पहिली हालचाल म्हणजे वंचित बहुजन आघाडीसोबतच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीबाबत अधिकृत घोषणा आणि दुसरी घटना म्हणजे दिल्लीतील ठाकरे गटाच्या गोटातील हालचाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत युतीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. तर दुसरीकडे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे. दादरमधील आंबेडकर भवनमध्ये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही पत्रकार परिषद होणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट उद्या निवडणूक आयोगात म्हणणं मांडणार

दुसरीकडे ठाकरे गट उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात आपलं लेखी म्हणणं मांडणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे ठाकरे गट उद्या निवडणूक आयोगाला प्रतिनिधी सभा आणि मुख्य नेता पदाबाबत लेखी म्हणणं पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात आता पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. या सुनावणीत शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उद्या किंवा परवा ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं पाठवणार आहे.

ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीवर शरद पवारांची भूमिका काय?

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच आपण या भानगडीत पडत नाही, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.