AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger: ठाकरेंपाठोपाठ काँग्रेस-NCP चे पण ‘ऑपरेशन’? 8 महिन्यात 16 झटके, ही यादीच घाम फोडणार

NCP, Congress Operation Tiger: राज्यात राजकीय महाभूकंप झाला. पण त्याचे हादरे, धक्के विरोधकांना बसत राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरेंपाठोपाठ काँग्रेस आणि एनसीपी फुटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या 8 महिन्यात 16 झटके देण्यात शिंदे सेना यशस्वी ठरली आहे.

Operation Tiger: ठाकरेंपाठोपाठ काँग्रेस-NCP चे पण 'ऑपरेशन'? 8 महिन्यात 16 झटके, ही यादीच घाम फोडणार
ठाकरेंपाठोपाठ काँग्रेस-NCP चे पण 'ऑपरेशन'?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 19, 2026 | 3:57 PM
Share

NCP, Congress Operation Tiger: राज्याचे राजकारण महाफुटीने पुन्हा ढवळून निघाले. उद्धव सेनेत पुन्हा बंडखोरी झाली. 6 खासदारांनी वेगळी चूल मांडली. ऑपरेशन टायगर फत्ते झाले. गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत व्हिप बजावलेला असतानाही हे सहा खासदार अनुपस्थित होते. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली आहे. तर हा स्वतंत्र गट लवकरच शिंदे सेनेत विलीन होणार असल्याचे समजते. तर पक्ष फुटीचे लोण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही पसरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापूर्वी गेल्या आठ महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकली तर महाविकास आघाडीला शिंदे सेनेने सातत्याने धक्के दिल्याचे दिसते.

ठाकरेंसह काँग्रेस, एनसीपीला ऑपरेशन टायगरचे 16 झटके

ऑपरेशन टायगरने केवळ उद्धव ठाकरे यांच्या सेनेलाच धक्का दिला नाही तर राज्यात गेल्या आठ महिन्यातील आकडेवारी पाहिल्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाही धक्के दिल्याचे लक्षात येईल.

7 जून 2026: यवतमाळ काँग्रेस नेते साहेबराव कांबळे शिंदे पक्षात सहभागी झाले. त्यांनी विधान परिषद निवडणुकीत माघार घेतल्याने त्यांना काँग्रेसने बडतर्फ केले.

4 जून 2026: माजी नागरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी शिंदे सेनेत दाखल झाले. हे चारही नेते भाजपमध्ये होते.

30 मे 2026: गोंदियाचे ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे शिंदे सेनेत

28 मे 2026 : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील माजी आमदार विनायक पाटील 25,000 कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत दाखल. हे सर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते होते.

14 मे 2026 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे शिंदे सेनेत दाखल झाले. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच शिवसेनेतून झाली होती.

30 एप्रिल 2026: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले

12 एप्रिल 2026: पंढरपूर येथील नगराध्यक्ष प्रणिका भालके शिंदे सेनेत

23 एप्रिल 2026: धुळ्याचे शिवसेनेचे पहिले महापौर आणि ठाकरे गटाचे भगवान करनकाळ शिंदे सेनेत दाखल

6 मार्च 2026: जळगावचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला

16 फेब्रुवारी 2026: नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार, शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे शिंदे सेनेत आले.

11 जानेवारी 2026: शिवडीचे कट्टर शिवसैनिक, उद्धव सेनेचे जवळचे दगडू सपकाळ हे शिंदे सेनेत आले.

18 जानेवारी 2026: बीड जिल्ह्यातील केजच्या माजी आमदार संगिता ठोंबरे शिंदे गटात दाखल झाल्या.

10 मार्च 2025 : पुण्यातील काँग्रेसचा चेहरा आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले.

24 डिसेंबर 2025: छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

16 डिसेंबर 2025: नवी मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचे नेते मनोहर मढवी यांनी शिंदे सेना जवळ केली.

11 नोव्हेंबर 2025: उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत आणि अगोदर भाजपमध्ये होते.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम