AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरेंची, नाही कुणाच्या बापाची; पुण्यातल्या आक्रमक शिवसैनिकांची घोषणा, उद्धव ठाकरे म्हणाले…

तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपण ज्यांना दिले ते तर गेले मात्र देणारे माझ्यासोबत आहेत, असा विश्वास आणि उत्साह उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये भरला.

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरेंची, नाही कुणाच्या बापाची; पुण्यातल्या आक्रमक शिवसैनिकांची घोषणा, उद्धव ठाकरे म्हणाले...
पुण्यातील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
| Updated on: Jul 06, 2022 | 6:30 PM
Share

मुंबई : शिवसेना (Shivsena) एकच आहे. एकच राहणार, ती म्हणजे आपली शिवसेना, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. पुण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट घेतली, त्यावेळी शिवसैनिकांना उद्देशून ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. विजय शिवतारे (Vijay Shivtare) एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाले. शिवसेनेला सध्या बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सामान्य शिवसैनिकांमध्ये बंडखोरांविरोधात संतापाची भावना आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड करून आणि भाजपाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये त्याची चीड आहे. त्याच भावनेतून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

‘धनुष्यबाण आपलाच आहे आणि राहणार’

आक्रमक शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, की हे (भाजपा) संपवायला निघाले आहेत. यांना शिवसेनेचे अस्तित्व नको आहे. त्यांना केवळ शिवसेना फोडायची नाही, तर संपवायची आहे, बळकवायची आहे. मात्र तुम्ही जोमाने कामाला लागा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्या मनात प्रश्न आहे, की आघाडी आहे, मग आपले काय? पण जिंकायची तयारी करा. मन घट्ट करा तर आपण विजय मिळवू. त्यासाठीच कामाला लागा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धनुष्यबाण आपलाच आहे आणि राहणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विजय शिवतारेंविरोधात घोषणाबाजी

आतापर्यंत ज्यांना देता येणे शक्य होते, जेवढे देणे शक्य होते, तेवढे दिले. मात्र त्यांनी ते घेऊन त्यांचे गुण दाखवले आहेत. आत्तातरी माझ्या हातात तुम्हाला देता येण्यासारखे काहीही नाही. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपण ज्यांना दिले ते तर गेले मात्र देणारे माझ्यासोबत आहेत, असा विश्वास आणि उत्साह त्यांनी शिवसैनिकांमध्ये भरला. दरम्यान, शिवसेना ठाकरेंची, नाही कुणाच्या बापाची तसेच विजय शिवतारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी विजय शिवतारेंविरोधात संताप व्यक्त केला. तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद शिवसैनिकांनी घातली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.