Anil Parab : उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल त्यामुळ विरोधकांना पोटशूळ, अनिल परबांचा विरोधकांना इशारा

शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेचे नेते या सभेत मार्गदर्शन करतील. पक्षप्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. अशी सभा दरवर्षी होते. यावेळी बीकेसीतलं सगळ्यात मोठं मैदान आहे. हे मैदान कमी पडेल, अशी प्रतिक्रिया यावेळी परबांनी दिली आहे.

Anil Parab : उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल त्यामुळ विरोधकांना पोटशूळ, अनिल परबांचा विरोधकांना इशारा
अनिल परब Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 7:45 PM

मुंबई : गेल्या तीन सभांमधून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्यात जोरदार रान पेटवलं आहे. हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील भोंगे (Loudspeakr Row) यावरून शिवसेनेवर टीकेची झोड उडवली आहे. त्यातच आगामी दिवसात महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजतंय. त्यामुळे भाजपसहीत इतर राजकीय पक्ष हेही जोमाने तयारीला लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनाही मैदानात उतरत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतील सभेने होणार आहे. त्या सभेवरून आता शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेचे नेते या सभेत मार्गदर्शन करतील. पक्षप्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. अशी सभा दरवर्षी होते. यावेळी बीकेसीतलं सगळ्यात मोठं मैदान आहे. हे मैदान कमी पडेल, अशी प्रतिक्रिया यावेळी परबांनी दिली आहे.

आमच्या सभेला मैदान कमी पडेल

तेसच मनसे नेते आमचे मार्गदर्शक नाहीत. आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. याचा पोटशूळ त्यांना आहेच. त्यांना ही सभा अभूतपुर्व होणार आहे हे माहित आहे. त्यामुळे त्याला आडव कसं जायचं हे बघत आहेत. पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही सभेकडे लक्ष देतो. तसेच निवडणुका कधीही होउदेत. शिवसेना ताकदीने लढणार आहे. उद्या त्याची प्रचिती दिसेल, असेही परब म्हणाले आहेत. तर दुरीकडे शिवसेनेवर सतत आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवरही त्यांनी टीका केली आहे. सोमय्यांना फक्त हेच काम आहे. पण कोण काय बोलतय याच्यात आम्ही आता लक्ष देत नाही आहे. आमचं लक्ष 14 तारखेवर आहे, असा इशारा यावेली परबांनी दिला आहे.

मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार?

तर शिवसेनेच्या तुलनेवरून बोलताना परब म्हणाले, आमची तुलना कोणाबरोब होऊ शकत नाही. बाकी कोण काय करत याला आम्ही महत्त देत नाही. हे सगळ्यांचे रंग आता हळू हळू दिसायला लागले आहेत. प्रत्येक जण आपआपले रंग दाखवतील. पण शिवसेनेचा रंग भगवा आहे आणि तो आयुष्यभर राहील, असे प्रत्युत्तर त्यांनी हिंदुत्वावरून होणाऱ्या टीकेला दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेवर हिंदुत्वावरून टीका होत आहे. राज ठाकरे यांनीही गुढी पाडव्याच्या सभेपासून शिवसेना आणि शरद पवार यांना टार्गेट केले आहे. तर सरकार स्थापनेपासून ते पाहटेच्या शपथविधीपर्यंत त्यांनी चौफेर बॅटिंग केली आहे. ट्विटवरून आणि फेसबुकवरूनही राज ठाकरे अनेकदा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत इशारा दिला होता. या सर्व गोष्टींचा मुख्यमंत्री सभेत कसा समचार घेणार? याकडे आता शिवसेनेच्या नजरा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.