AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीलम गोऱ्हे की धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक? शिवसेनेचा चेहरा कोण?

Vidhan Parishad Election Eknath Shinde: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत भाजपने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची खलबतं सुरू आहे. आता नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देणार की शिंदे नवीन चेहरा समोर आणून धक्का देणार?

नीलम गोऱ्हे की धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक? शिवसेनेचा चेहरा कोण?
विधान परिषद निवडणूक, एकनाथ शिंदेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 29, 2026 | 2:44 PM
Share

Vidhan Parishad Election Eknath Shinde: विधान परिषद निवडणूक आता अगदी जवळ आली आहे. महायुतीत भाजपने सहा उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची कालपासून मॅरेथॉन बैठक सुरू आहे. 70-75 उमेदवारांपैकी कुणाचा नंबर लागणार हे आज संध्याकाळी समोर येईल. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मनात काय सुरू आहे हे समोर आलेले नाही. बच्चू कडू, नीलम गोऱ्हे की शिंदे धक्कातंत्राचा वापर करणार याची चर्चा रंगली आहे. बच्चू कडू यांनी आज वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे शिंदे कोणता मास्टरस्ट्रोक खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू, नीलम गोऱ्हे की अजून कोणी?

महाविकास आघाडीकडून अजून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली नाही. जर उद्धव ठाकरे नसतील तर मग शिंदे सेना दोन उमेदवार पुढे करू शकते. जर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. तर कदाचित एका जागेसाठी क्रॉस वोटिंगचा प्रयोग होऊ शकतो. बच्चू कडू यांचा प्रयोग अजून फसलेला नाही. पण अटी आणि शर्तीविना कडू मैदानात उतरू शकतात. त्यांचा पत्ता कट झाल्यास नीलम गोऱ्हे अथवा इतर कुणाला लॉटरी लागणार हे अद्याप समोर आलेले नाही. राज्यसभेवेळी अनेक दिग्गज मैदानात असताना एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केला. सोलापूर येथील ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे यावेळी शिंदे कोणता मास्टरस्ट्रोक मारतात याची चर्चा रंगली आहे.

उद्यापर्यंत चित्र स्पष्ट

विधान परिषदेचे 9 आमदार येत्या 13 मे रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या रिक्त जागेसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे आज संध्याकाळी अथवा उद्या सकाळी शिंदे सेनेला उमेदवार जाहीर करणे आवश्यक आहे. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत शिंदे गटाकडे 57 जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अधिक मताच्या बेगमीवर एक अजून जागा निवडून आणण्याची खेळी शिंदे सेना करणार असल्याचे समोर येत आहे. बच्चू कडू, नीलम गोऱ्हे की अजून तिसराच उमेदवार याविषयी चर्चा रंगली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा