AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिंदेचा सत्कार नव्हे महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार’, संजय राऊतांचा थोरल्या पवारांवर थेट निशाणा, महाविकास आघाडीत ठिणगी?

Sanjay Raut on Sharad Pawar : दिल्लीच्या तख्तासाठी मराठ्यांनी अनेक वर्ष रक्त सांडलं. पानीपतामुळे बांगडी फुटली नाही, असं गाव महाराष्ट्रात नव्हतं. दिल्लीतील एका राजकीय घडामोडीमुळे राज्यात वादळं उठलं आहे. महाविकास आघाडीत अनेक दिवसांनी ठिणगी पडली आहे.

'शिंदेचा सत्कार नव्हे महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार', संजय राऊतांचा थोरल्या पवारांवर थेट निशाणा, महाविकास आघाडीत ठिणगी?
संजय राऊत यांचे थोरल्या पवारांवर टीकास्त्र
| Updated on: Feb 12, 2025 | 10:24 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विशेषतः महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. आज सकाळच्या पत्र परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांना खडेबोल सुनावत महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली. त्यावरून राज्यात पुन्हा शा‍ब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हं आहेत.

हा तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार

यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे, असा घणाघात राऊतांनी केला. त्यांनी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होते, त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावायला नको होती, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली.

पवारांनी जायला नको होतं

शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहिती नाही. पण आम्हालाही दिल्लीतील राजकारण कळतं पवार साहेब, असा घणाघात राऊतांनी घातला.

कोण, कोणाला टोप्या घालतंय हेच कळेना

कोण,कोण कोणाला टोप्या घालतंय आणि टोप्या उडवतंय हेच काही कळेनास झालं आहे. कोण गुगली टाकतंय हे कळत नाही.  गद्दारांना असे सन्मान देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का असल्याचे राऊत म्हणाले.  दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमात शरद पवार गेल्याने, संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली. यामुळे या सत्कार सोहळ्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?