मोठी बातमी! अजितदादांकडून भाजपच्या कारभाराची चिरफाड, पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज चिन्ह वाटप झालं. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक लढवण्याची भूमिका तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. मागील जवळपास ९ वर्षामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो. भाजप सत्तेत होता. भाजप सत्तेत असताना जो काही कारभार झाला त्याची माहिती पुणेकरांना समजली पाहिजे, त्यात निष्क्रियता आली. शिथीलता आली. प्रशासकाच्या काळातील समस्यांचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मतदार देशाच्या निवडणुकीत वेगळा विचार करतात. विधानसभेला मतदार राज्याचा विचार करतात आणि नगर पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या ठिकाणी तिथली परिस्थिती आणि सत्तेतील लोकांनी केलेला कारभार पाहून मतदान करतात. पाच वर्ष ज्या राजकीय पक्षाकडे सत्ता होती, पिंपरी चिंचवड महापालिकेत मी २५ वर्ष कारभार केला. शहराचा विकास केला. कठोर भूमिका घेतली. काही वेळा वेगवेगळे निर्णय घेतले. पण शहराच्या विकासासाठी आम्ही ते केलं. आमच्या ताब्यात महापालिका असताना आम्ही काम केलं.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करावं लागत असतं. पिंपरी चिंचवडचं योग्य नियोजन केलं. पुण्यापेक्षा चिंचवडचे रस्ते रुंद झालेले आहे. त्यामुळे तिथे वाहतुकीची समस्या जाणवत नाही. भाजपकडे पुण्याची एक हाती सत्ता आली. सरकारमध्ये काम करत असताना वेगळा विचार करून काही धोरणं आखली होती. त्यात मेट्रो असेल, रिंग रोड असेल अशा अनेक गोष्टी होत्या.
त्या काळात रिंग रोडची किंमत १० हजार कोटी होती. आता ती किंमत ४० हजार कोटी झाली आहे. आता टेंडर काढलं आहे. नदीला खूप खराब पाणी सोडलं जातं. एसटीपी प्लान करण्यासाठी अग्रक्रम द्यायला हवा होता. युद्ध पातळीवर काम करायला हवं होतं. एसटीपी प्लानची कामं ज्या गतीने व्हायला पाहिजे होती, त्या गतीनं झाली नाहीत. तिघांचा कारभार होता, पण पाठपुरावा करण्यात इथलं नेतृत्व अपयशी ठरलं. त्यामुळे पिण्याचं पाणी, रस्ते वाहतूक नियोजन असेल ते व्यवस्थित नाहीत, असा आरोप यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
