नागपुरमध्ये मोठी दुर्घटना! कोऱ्हाडी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळला, गेटखाली अनेकजण दबले
नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. कोऱ्हाडी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळला आहे. गेटखाली अनेकजण दबले असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. कोऱ्हाडी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळला आहे. गेटखाली अनेकजण दबले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सायंकाळी घडली घटना
आज सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेत काही भाविक गेटखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. सध्या जखमींना बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
या अपघातात 5-6 मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंदिराच्या गेटनंबर 4 जवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला तात्काळा मदतकार्य सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर काय म्हणाले?
या घटनेबाबत बोलताना नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले की, गेटचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. यात काही मजूर अडकले होते त्यांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पालकमंत्र्यांचा फोन आला होता, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. आता गेटखाली कोणीही नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम पोलिस करत आहेत. जखमींना दवाखान्यात नेण्यात आले आहे. खात्री करण्यासाठी आम्ही गेटखाली कोण आहे की नाही ते तपासत आहोत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
