नागपुरात तिघा कैद्यांची प्रतिस्पर्ध्याला मारहाण, भांड्यापासून बनवलेल्या शस्त्राने जेलमध्ये हल्ला

अनिश बेंद्रे

|

Updated on: Apr 26, 2021 | 8:07 AM

आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने रोशन शेखवर वार केले. (Nagpur Prisoners beaten up inmate)

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांनी प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने कैदी रोशन शेखवर वार करण्यात आले. हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Nagpur Prisoners beaten up inmate in Nagpur Jail)

नागपूर मध्यवर्ती कारागृहात रविवारी तिघा कैद्यांनी रोशन कयूम शेख या प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. रोशन मकोको कायद्या अंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून कारागृहात बंद आहे. रोशन कारागृहातही गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाल्याचे बोलले जाते.

शिवीगाळ केल्याने तिघांकडून हल्ला 

रविवारी सकाळी रोशन आंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या काही कैद्यांना त्याने शिवीगाळ केली. यावरुन संतप्त झालेल्या तिघांनी रोशनवर हल्ला केला. रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

रोशन रुग्णालयात दाखल, तिघांवर गुन्हा

रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षारक्षक धावून गेले. त्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडाऱ्यात कैद्याची पोलिसाला मारहाण

भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने इतर कैद्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती. कैदी कार्तिक बकाराम मेश्रामने कैदी किरण शिवशंकर समरीत याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केली. त्यावेळी कारागृह पोलीस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही धक्का दिला.

या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तिथेही पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होत हाणामारी सुरु झाली. तेव्हा पुन्हा पोलीस कर्मचारी घरत यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मेश्रामने पोलीस कर्मचारी घरत यांचीच कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही, तर जमिनीवरील 5 ते 7 किलो वजनाचा दगड उचलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.

संबंधित बातम्या :

कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न

(Nagpur Prisoners beaten up inmate in Nagpur Jail)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI