‘मनाचा थरकाप उडवणारं, ज्याला ताट भरुन दिलं त्याने…’;, नितीन राऊत संतापले

अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या कृतीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

'मनाचा थरकाप उडवणारं, ज्याला ताट भरुन दिलं त्याने...';, नितीन राऊत संतापले
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:57 PM

सुनील ढगे, Tv9 प्रतिनिधी | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “काय म्हणावं, एखाद्याला पक्षाने भरभरून दिलं, ज्याला ताट भरून दिलं होतं, त्याने त्या ताटालाच लाथ मारावी आणि जावं, अशी ही घटना आहे. मनाचा थरकाप उडवणारी, वेदना देणारी ही घटना आहे”, अशी भावना नितीन राऊत यांनी व्यक्त केली. “एका नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने तयार केलं. लहानाचा मोठा केलं आणि आजही ज्याच्या सांगण्यावरून राज्यातली ध्येयधोरण निश्चित केली जात होती त्या व्यक्तीने पक्ष सोडणे हे काँग्रेस पक्षाला दगा देण्याचं काम आहे”, अशी टीका नितीन राऊत यांनी केली.

“याआधी अनेक जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण त्यांच्या मर्यादा होत्या. त्यांना काँग्रेस पक्षाने खूप दिलं असं नाही. मात्र अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं, प्रदेशाध्यक्ष पद दिलं, सीडब्ल्यूसी मेम्बर केलं, एक सक्षम नेतृत्व तयार केलं. अशा नेतृत्वाने दगाबाजी करणे हे मनाला खंत लावून जाणारं आहे”, असं नितीन राऊत म्हणाले. “अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊ नये. शेवटी पक्षाची विचारधारा जी आहे ती महत्त्वाची असते. स्वतःच्या प्रगती पेक्षा पक्ष आणि विचारधारा महत्त्वाची असते. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे”, असं नितीन राऊत म्हणाले.

‘हे बरेच दिवसांपासून चाललेलं होतं’

“प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवण्याचं काम होत आहे, असं मला दिसत नाही. पक्ष सोडून हे जाणार आणि भाजप याचा आनंद करणार. हे बरेच दिवसांपासून चाललेलं होतं. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाकडे बघून हे गेले असं मला वाटत नाही. याच्या पाठीमागे दुसऱ्या काही संघटना काम करत आहे, असं मला वाटते”, असंही राऊत म्हणाले.

“सामान्य कार्यकर्ता हा समजूतदार आहे. राहुल गांधी यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनाशी संवाद साधत आहे. त्यांना समर्थन प्राप्त होत आहे. अशा वेळेला किंवा सत्तेचा अभ्यास लक्षात घेऊन एखादा नेता पक्ष सोडत असेल तर काँग्रेसचा कार्यकर्ता त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता हा निष्ठावान आहे. तो कधीही मागे सरकत नाही. तो पुढे सरसावून काँग्रेसच्या संरक्षणासाठी पुढे येणार आहे”, असा दावा नितीन राऊत यांनी केला. “1978ला असंच होतं त्यावेळेला सुद्धा मोठमोठे नेते सोडून गेले होते. पक्ष संपेल असं वाटत होतं. मात्र केंद्रातील लोकांनी त्यांचं चिरहरण केलेलं आहे. अशोकराव चव्हाण सारख्यांनी हे समजून घेतलं पाहिजे”, असं नितीन राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.