नागपूरची तुंबई कुणी केली? एकाच पावसात वस्त्यांमध्ये पाणी, रस्ते पाण्याखाली, मुंबई होतेय?

नागपुरात काल झालेल्या एका दिवसाच्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे.

नागपूरची तुंबई कुणी केली? एकाच पावसात वस्त्यांमध्ये पाणी, रस्ते पाण्याखाली, मुंबई होतेय?
संग्रहित छायाचित्र.


नागपूर : नागपुरात काल झालेल्या एका दिवसाच्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरातील विविध भागात पाणी साचलं, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, रस्ते जलमय झाले होते. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरात पाणी साचणार नाही, असे दावे केले होते. मात्र, या पावसानं प्रशासनाने केलेले दावे फोल ठरवले आहेत. (Heavy rains cause waterlogging in parts of Nagpur, Homes flooded in few hours of rain)

शहरात काल या मोसमातील पहिला मुसळधार पाऊस पडला. दिवसभरात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांच्या घरात पाणी आलं. शहराच्या सिव्हिल लाईनसारख्या भागातही पाणी जमा होतं. सिमेंट रस्ते उंच झाल्यामुळे खोलगट भागात पाणी साचतं. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणी जमा होत असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वणवे यांनी पालिकेच्या कारभारावर बोट उचललं आहे.

नागपूर शहराच्या खोलगट भागात पाणी साचलं, हे महापौर दयाशंकर तिवारी यांनी मान्य केलं आहे. मात्र, त्यांनी याचं खापर तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि कोव्हिड-19 वर फोडलं आहे. तुकाराम मुंढे यांनी कामं करू दिली नाहीत आणि कोरोनामुळं कामं करता आली नाहीत, असं महापौरांनी सांगितलं. यावर त्यांनी अधिकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

व्हिडीओ पाहा

पावसाळी पाण्याचं नियोजन करण्यासाठी नागपूर महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. तरिही मोठा पाऊस झाला की, शहरात विविध ठिकाणी पाणी साचत आहे. सिमेंट रस्त्यामुळे पावसाचं पाणी जायला जागा नसल्याने नागपूरातील बऱ्याच भागात पाणी साचतंय. याचा सर्वसामान्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळं महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने एकमेकांकडे बोट न दाखवता यावर तोडगा काढावा, ही सर्वसामान्यांची भावना आहे.

इतर बातम्या

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली

कुख्यात गुंड सहा महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला, नागपूरच्या पांढरबोडी भागात घुसताच दुश्मनांनी घेरलं, विटांनी ठेचून हत्या

(Heavy rains cause waterlogging in parts of Nagpur, Homes flooded in few hours of rain)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI