अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्यांचा सवाल

रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. नागपूर विभागात 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्यात आलाय.

अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्यांचा सवाल
शेतकरी
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 2:33 PM

नागपूर: रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. नागपूर विभागात 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्यात आलाय. सिंचनासाठी वीज नसल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात आले आहेत. अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीय. बुटीबोरी परिसरात 500 च्या वर शेतीपंपाची वीज खंडीत केली गेलीय. त्यामुळं खरिपात गहू, चणा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला केलाय.

राज्यात अतिवृष्टी झाली, पिकांचं मोठं नुकसान झालं. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी हंगामात मोठी आशा होती. पण, महावितरणच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामंही धोक्यात जाण्याची शक्यता आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय. महावितरणने नागपूर विभागात 10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत केलीय, त्यामुळे आता रब्बी पेरणीसाठी शेती तयार आहे, पण सिंचनासाठी वीज नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडलेत.

कुटुंब कसं जगवायचं?

अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. गहू, चणा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? लेकराबाळांचं पोट कसं भरायचं? की आत्महत्या करायची? संतप्त शेतकऱ्यांचा हा सरकारला सवाल आहे.

किमान दिवाळीपर्यंत थांबायला हवं होतं

खूप मोठं संकट आणि खूप मोठ या दिवाळीच्या तोंडावर आलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न मिळालं नाही.शेतकऱ्यांची वीज कापलीय. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पेरणी कशी करावी, असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

इतर बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह

Mahadiscom cut ten thousand farmers electricity connection on the time of rabbi season

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.