नागपूर विधान भवनातील शिवसेना कार्यालय कुणाला?, शिंदे गटाला की ठाकरे गटाला?; राजकीय घडामोडी वाढल्या

गजानन उमाटे

गजानन उमाटे | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 12:55 PM

पण आगामी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधिमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं? यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

नागपूर विधान भवनातील शिवसेना कार्यालय कुणाला?, शिंदे गटाला की ठाकरे गटाला?; राजकीय घडामोडी वाढल्या
नागपूर विधान भवनातील शिवसेना कार्यालय कुणाला?
Image Credit source: tv9 marathi

नागपूर: खरी शिवसेना कुणाची हा वाद अजून सुटलेला नाही. निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने तर शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण गोठवलं आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न प्रलंबित असतानाच आता पक्षाच्या कार्यालयावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हे दोन्ही गट आमने सामने येणार आहेत. नागपूर विधान भवनातील शिवसेना कार्यालय कुणाला द्यायचं? यावरून दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागपूर विधीमंडळ परिसरांत असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं? आगामी हिवाळी अधिवेशनात पक्ष कार्यालयात ठाकरे गट बसणार की शिंदे गट? यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. 19 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यालय सज्ज होत आहे. पण शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयाचा बोर्ड कापडाने झाकून ठेवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर ‘शिवसेना’ कुणाची हा वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडेही याची सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ असे नाव मिळाले आहे.

पण आगामी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधिमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं? यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयाचा बोर्ड कापडाने झाकून ठेवलाय. त्यामुळे हे कार्यालय कोणत्या गटाला मिळणार की हे कार्यालय बंद ठेवून दोन्ही गटाला वेगवेगळं कार्यालय दिलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या 19 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे 15-16 डिसेंबरच्या आसपास हे कार्यालय कुणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, कार्यालयाबाबत कोणत्याही गटाने अजून त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI