नांदेड जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा… केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक
Nanded District Drought Vishnupuri Dam 30 percent water reserve : नांदेडमध्ये पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण नांदेडला पाणीपुरवठा करण्याऱ्या विष्णूपुरी धरणात केवळ 30 % पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात पाणी कपाती केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वत्रच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अशात मराठवाड्यातील काही भागात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये पाणीकपात केली जाण्याची शक्यता आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात 24 टक्के पाणी साठा शिल्लक आहे .याच धरणातून नांदेड शहराला सध्या दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तर नांदेड जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
किती टक्के पाणी शिल्लक?
नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत केवळ 30 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील 21 गाव, वस्ती तांड्याना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात यावर्षी 275 खाजगी विहीर, बोअरचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.
कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?
विष्णुपुरी धरण – 24 टक्के
लोअर मनार प्रकल्प – 25.16 टक्के अप्पर मानार प्रकल्प – 3.71 टक्के पेठवडज प्रकल्प – 21. 63 टक्के
इतर प्रकल्पांमध्ये किती टक्के पाणीसाठा
आमदुरा – 25 टक्के बाभळी – 12 टक्के बळेगाव – 51 टक्के
नांदेड जिल्ह्यात सध्या 21 गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिह्यातील 21 गाव, वस्ती तांड्यात 21 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 275 खाजगी विहीर आणी बोअरचे अधिग्रहण करुन नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जात आहे. कंधार तालुक्यात 14 टँकरेने पाणी पुरवठा केला जात आहे. मुखेड गावात 5, माहुरला 1 आणि भोकरमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणीतही पाणी टंचाई
मे महिन्यात परभणी जिल्ह्यात दुष्काळची चांगलीच झळ बसलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये दुष्काळची तीव्रता जास्त आहे. बोरी, कौसडी भागात भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परभणीतील प्रमुख धरण असलेल्या येलदरी जलाशयात केवळ 28% जिवंत पाणीसाठा आहे. त्यात गाळ सहा टक्के आहे.त्यामुळे एकूणच येलदरी जलाशयात केवळ 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.या पाणी साठ्यावर परभणी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याची पाण्याची मदार आहेय वेळेवर मानसून दाखल झाला नाही तर परभणी जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. परभणी जिल्ह्यात सध्या 14 टँकरने पाणी पुरवलं जात आहे.
