नाशिक जिल्ह्यातील लघु उद्योजकांचा होणार गौरव, 15 डिसेंबरपर्यंत मागवले अर्ज, जाणून घ्या काय आहेत निकष

2021 च्या पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योग हा 01 जानेवारी 2018 ला किंवा त्यापूर्वी उद्योग आधार म्हणून नोंदणी झालेला असावा. तसेच सगल दोन वर्षे उत्पादनात असणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यातील लघु उद्योजकांचा होणार गौरव, 15 डिसेंबरपर्यंत मागवले अर्ज, जाणून घ्या काय आहेत निकष
संग्रहित छायाचित्र.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Nov 15, 2021 | 5:57 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील लघु उद्योजकांच्या पाठीवर शासनाची कौतुकाची थाप पडणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्‍ह्यातील दोन लघु उद्योग घटकांची निवड करून त्यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. 2021 या वर्षाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांनी 15 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे.

पुरस्काराचे स्वरूप

शासनाने या पुरस्कारांची सुरुवात 1986 मध्ये केली आहे. त्यात प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये रोख, मानचिन्ह शाल आणि श्रीफळ आहे. दुसरा पुरस्कार हा 10 हजार रुपये रोख, मानचिन्ह शाल व श्रीफळ असा आहे. सन 2021 च्या पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योग हा 01 जानेवारी 2018 ला किंवा त्यापूर्वी उद्योग आधार म्हणून नोंदणी झालेला असावा. तसेच सगल दोन वर्षे उत्पादनात असणे आवश्यक आहे. यापूर्वी जे लघु उद्योग घटकांना राष्ट्रीय अथवा आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत, ते या पुरस्कारास पात्र ठरणार नाहीत, असेही कळवण्यात आले आहे.

पुरस्काराचे निकष

जिल्हा पुरस्कारसाठी पुढील निकषांच्या आधारे निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्योग घटकाची स्थिर मत्ता, उत्पादन व कामगार यांच्यामधील वाढ, तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकाची पार्श्वभूमी, उद्योगासाठी निवडलेली जागा, उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता, आयात- निर्यात, नवीन उत्पादनासाठी धडपड, घटकाचे व्यवस्थापन, मशिनरीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व यंत्रसामुग्रीची देखभाल, कामगारांसाठी केलेल्या कल्याणकारी योजना, महिला व अनु.जाती व अनु जमातीचे उद्योजकांना प्राधान्य या निकषांचा समावेश असणार आहे.

येथे मिळतील अर्ज

पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज हे जिल्हा उद्योग केंद्र नाशिक येथे उपलब्ध होणार असून, इच्छुक लघु उद्योग उपक्रम धारकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत हे अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

इतर बातम्याः

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

शेतकऱ्यांसाठी विशेष टास्क फोर्स, 1 हजार प्रकल्पांना देणार मान्यता, कृषिमंत्री भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा; असा होणार फायदा

मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी संस्थांना लागू करा; शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात नाशिकमध्ये मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें