AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | महापालिका निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे 10 अधिकारी, प्रशासनाने काय सुरू केली तयारी?

सध्या महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. पालिकेच्या वतीने या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल.

Nashik | महापालिका निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे 10 अधिकारी, प्रशासनाने काय सुरू केली तयारी?
Nashik Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 1:07 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, मनसेने कंबर कसलेली असताना आता प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत येत्या 15 मार्चला संपतेय. त्यापूर्वी एक मार्चला त्यांना नगरविकास विभागाकडून पत्र येईल आणि 20 एप्रिलनंतर कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. पालिकेच्या वतीने या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विहित नमुन्यात विवरण पत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील आणि निवडणूक जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी सुरू

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने देखील तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत यंदा 10 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. नाशिक महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार आता लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे नियुक्त केले जाणार आहेत त्यातील एका निवडणूक निर्णय अधिकारी याकडे सुमारे 4 प्रभागांची जबाबदारी असणार आहे. शिवाय प्रशासनाने निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, हे ध्यानात घेता इतरही तयारी सुरू केली आहे.

एक प्रभाग 33 हजारांचा

महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभाग रचनेचे काम पुन्हा करावे लागले. प्रभाग रचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.