संचित रजा मंजूर न केल्याचा राग, नाशिक जेलमध्ये कैद्याने सॅनिटायझर प्यायलं

नाशिक कारागृहातील कैदी अविनाश जाधव याने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Nashik Jail Prisoner Suicide attempt )

संचित रजा मंजूर न केल्याचा राग, नाशिक जेलमध्ये कैद्याने सॅनिटायझर प्यायलं
jail

नाशिक : सॅनिटायझर पिऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संचित रजा नामंजूर केल्याचा राग आल्याने कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कारागृह प्रशासनाला वेळीच हा प्रकार समजल्याने त्याचे प्राण बचावले आहेत. (Nashik Jail Prisoner Avinash Jadhav Suicide attempt by drinking Sanitizer)

नाशिक कारागृहातील कैदी अविनाश जाधव याने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारागृहातील अधिकारी त्रास देत असल्याची सुसाईड नोटही त्याने तयार केली होती. अविनाश जाधववर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.

नांदेडमध्ये पॅरोलवरील कैद्याचा गळफास

काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या माजी आमदारपुत्राने गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुनील पाचपुते याने नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. 53 वर्षीय सुनील पत्नीच्या हत्येप्रकरणी औरंगाबादमधील हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

तळोजा तुरुंगातील कैद्याची खारघरमध्ये आत्महत्या

खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आला होता. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतला होता. तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक कैदी क्वारंटाईन करण्यात आले होते. महम्मद सुलेमान दिल्लीतील ‘एनडीपीएस’ ड्रग्ज प्रकरणातही सहभागी होता.

तळोजा तुरुंगातही कैद्याने स्वतःला संपवलं

तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्याने आत्महत्या केल्याचा प्रकार गेल्या वर्षी मे महिन्यात उघडकीस आला होता. शौचालयात चादर अडकवून कैद्याने 27 मे रोजी आत्महत्या केली होती. बालू गड़सिंगे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव होते. त्याने पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली होती. गड़सिंगे याच्यावर माजलगाव, शिवाजीनगर अशा काही ठिकाणी चार ते पाच गुन्हे दाखल होते. कलम 302 आणि 354 अंतर्गत 2017 पासून तो शिक्षा भोगत होता.

संबंधित बातम्या :

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास

(Nashik Jail Prisoner Avinash Jadhav Suicide attempt by drinking Sanitizer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI