VIDEO | हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले

तरुणाच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला (Nashik Chandvad Hospital wife)

VIDEO | हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 11:08 AM

नाशिक : बेड न मिळाल्यामुळे एका तरुणाने नाशिकमधील रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली आहे. पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने अखेरचा श्वास घेतल्याने उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. (Nashik man dies outside Chandvad Hospital in front of wife)

अरुण माळी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुणला त्रास होऊ लागल्यानंतर पत्नी सुरेखा त्याला घेऊन रुग्णालयात आली होती. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन चेक केले. अरुणच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ :

नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 22 जणांचा मृत्यू

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

(Nashik man dies outside Chandvad Hospital in front of wife)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.