हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच छगन भुजबळ नाराज?; म्हणाले, हे अपेक्षित…

Chhagan Bhujbal Reaction on Hemant Godse Candidacy declared for Nashik Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदेगटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर झालं आहे. त्यांच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच छगन भुजबळ नाराज?; म्हणाले, हे अपेक्षित...
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 1:52 PM

महायुतीच्या जागावाटत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक… नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत महायुतीत वारंवार खलबतं झाली. हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे इथले विद्यमान खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होत आहे.

नाराजीच्या चर्चांवर भुजबळ म्हणाले…

हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केलं आहे. ठीक आहे हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल, असं भुजबळ म्हणाले.

अर्ज कधी भरणार?

भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. अर्ज भरताना मोठी मिरवणूक निघेल. संपूर्ण नाशिक मतदारसंघातील आणि दिंडोरी मतदार संघातील लोक या रॅलीला येतील. जेवढे महायुतीचे कार्यकर्ते आहेत सर्व एकत्र येतील. मिरवणुकीत सामील होतील, असं भुजबळांनी सांगितलं.

त्यामुळे प्रतार करणं सोपं जाईल- भुजबळ

वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे. दहा वर्षाचे खासदार होते. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या पंधरा-सोळा दिवसात आम्ही पूर्णपणे ताकतीन प्रचाराचं काम करू. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करून पाठवू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.