AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संकटमोचक’ मैदानात, बंद दाराआड चर्चा, नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भाजपचे 'संकटमोचक' म्हणून ख्याती असलेले नेते मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या राजकारणात आता सक्रीय झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

'संकटमोचक' मैदानात, बंद दाराआड चर्चा, नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
| Updated on: Apr 30, 2024 | 7:03 PM
Share

महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिकच्या जागेबाबात गेल्या अनेक दिवसांपासून तिढा आहे. नाशिकमध्ये सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून नाशिकचे खासदार आहेत. पण यावेळी त्यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे ते सातत्याने मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत आहेत. तरीही नाशिकच्या जागेचा तिढा सुटला नाही. विशेष म्हणजे आधी भाजप, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या जागेसाठी दावा करण्यात आला. त्यामुळे हा तिढा आणखी जास्त घट्ट झालाय. पण आता नाशिकच्या जागेचा तिढा सोडण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे भाजपचे ‘संकटमोचक’ अशी ख्याती असलेले नेते मंत्री गिरीश महाजन हा तिढा सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्या बंद दाराआड चर्चा

गिरीश महाजन आज नाशिकमध्ये दाखल झाले आहे. नाशिकमध्ये येताच गिरीश महाजन हे शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात गेले. इथे गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महाराजांनी माघार घ्यावी, यासाठी गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. हिंदू मतं विभागली जाऊ नये यासाठी शांतिगिरी महाराजांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. कारण गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यातील बोलणी फिस्कटली आहे.

शांतिगिरी महाराज उमेदवारीवर ठाम

शांतिगिरी महाराज आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढणार आहेत. शांतिगिरी महाराजांना भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचं मत आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहावं, अशी महाराजांनी महाराजांना विनंती केली आहे. तर येत्या दोन दिवसात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल, असा महाजन यांचा दावा आहे.

गिरीश महाजन यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासोबत बंद दाराआड चर्चा

गिरीश महाजन यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचीदेखील भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चादेखील झाली आहे. यावेळी नाशिकच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गिरीश महाजन आणि अजय बोरस्ते यांच्यात भाजप कार्यालयातचं खलबत झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्षक नाशिकच्या दौऱ्यावर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. मंत्री गिरीश महाजन आज सकाळपासून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विविध बैठका घेत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देखील विविध बैठका होण्याची शक्यता आहे. विशष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे देखील आज नाशिक मुक्कामी आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.