महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट!; छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?

Chhagan Bhujbal May Contest Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत? नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय? महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. वाचा सविस्तर...

महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट!; छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?
Nashik Chhagan Bhujbal May Contest Lok Sabha Election 2024 NCP Ajiy Pawar Group Latest Marathi News
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 9:27 AM

लोकसभा निवडणुकीसाठीचं महायुतीचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. भाजपने जरी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांवरचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपात नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

नाशिकच्या जागेवरून तिढा कायम

सध्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे हे नाशिकचे खासदार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांआधी बोलताना हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. त्यांनंतर महायुतीतील विशेषत: भाजपचे नेते, कायकर्ते नाराज झाले होते. भाजपचे नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय आता छगन भुजबळदेखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे.

भुजबळांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू

नाशिकच्या जागेवरून महायुतीतील संबंध ताणले गेलेले असतानाच आता एक नवा ट्विस्ट आला आहे. छगन भुजबळ यांच्याकडून मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मराठा आंदोलनातील छगन भुजबळांची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा काय परिणाम होऊ शकतो? जर भुजबळ या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले तर मराठा आरक्षणाबाबतच्या त्यांच्या भूमिकेचा फायदा होणार की तोटा? याची चाचपणी सध्या सुरु आहे.

नेमकं काय घडणार?

छगन भुजबळ आणि त्यांच्या टीमकडून नाशिक मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. त्यामुळे जर या ठिकाणी सकारात्मक स्थिती दिसली. तर मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी केली जाऊ शकते. भाजप आणि शिंदे गटा वाद असतील तर आम्ही या ठिकाणाहून लढतो, अशी भूमिका अजित पवार गट घेऊ शकतो. दरम्यान, या सगळ्याबाबत छगन भुजबळ यांनी मात्र अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Non Stop LIVE Update
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.