Nashik Accident | नाशिक-औरंगाबाद रोडवर स्कूल बस-छोटा हत्तीचा अपघात, 2 गंभीर जखमी, विद्यार्थी सुखरूप

या धडकेत दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे सह कर्मचारी घटनास्थळी हजर झाले अपघातातील जखमींना लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

Nashik Accident | नाशिक-औरंगाबाद रोडवर स्कूल बस-छोटा हत्तीचा अपघात, 2 गंभीर जखमी, विद्यार्थी सुखरूप
नाशिक अपघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:10 PM

नाशिकः नाशिक ते औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य महामार्गावर स्कूल बस आणि छोटा हत्ती वाहनाची समोरासमोर धडक (Accident) झाल्याने विचित्र अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की स्कूल बसला (School Bus) धडकलेल्या वाहनाचा चक्काचूर झाला. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सुदैवाने शाळकरी विद्यार्थी सुखरूप आहेत. या अपघामातासाठी रस्ते दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या बेफिकिर कारभारामुळे हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येवला तालुक्यातील देशमाने शिवारात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

nashik Acci 2

कसा घडला अपघात?

या घटनेविषयी प्राथमिक माहितीनुसार, येवला तालुक्यातील ममदापूर येथून संतोष लहानू लांडगे हा शेतकरी आपला कांदा MH 15 ck 8920 या छोटा हत्ती वाहनातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार असलेल्या विंचूर येथे विक्रीसाठी घेऊन येत होता. तर एस एन डी महाविद्यालयाची MH 15 AK 902 स्कूल बस ही येवल्याच्या दिशेने येत होती. यावेळी नाशिक- औरंगाबाद मार्गावर काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग तर काही ठिकाणी साईट पट्ट्या मारण्याचे काम सुरू आहे. येवला तालुक्यातील देशमाने शिवारात एकेरी वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने केली होती. याबाबत वाहनचालकांना कुठलेही निर्देश देण्यासाठी ठेकेदाराने कर्मचारी नियुक्त केले नसल्यामुळे कांद्याने भरलेले छोटा हत्ती वाहन तसेच स्कूल बस समोरासमोर आल्यामुळे जोरदार धडक झाली..

हे सुद्धा वाचा

nashik Acci 3

वाहनांचे नुकसान, दोघे जखमी

या धडकेत दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे सह कर्मचारी घटनास्थळी हजर झाले अपघातातील जखमींना लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे छोटा हत्ती वाहनातील शेतकरी वाहनचालक संतोष लहाने लांडगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे स्कूल बस मधील चालकासह विद्यार्थी सुखरूप आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहेत या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होते

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.