AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदगावच्या सेना आमदाराची काल भुजबळांशी खडाजंगी, आज शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा

छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आज दिलजमाई झाली सुद्धा मात्र, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून नियोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली.

नांदगावच्या सेना आमदाराची काल भुजबळांशी खडाजंगी, आज शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 5:20 PM
Share

नाशिक: राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव तहसील कार्यालयात खडाजंगी झाली होती. छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आज दिलजमाई झाली सुद्धा मात्र, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून नियोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी पुढील निवडणुकीत येवला विधासभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवायचा निश्चय शिवसैनिकांनी केला. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आता छगन भुजबळ यांच्या समोर शिवसेनेकडून आव्हान उभे केले जाणार का असा प्रश्न यानिमिताने उपस्थित केला जातोय.

येवला मतदासंघाववर भगवा फडकवण्याचा निर्धार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येणाऱ्या दिवसात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजित नाशिक जिल्ह्यात करण्यात आले. येवल्यातून संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की पुढील निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे ,माजी आमदार कल्याणराव पाटील ,स्थानिक नेते संभाजी पवार यांनीही आम्ही तयार आल्याचे सांगितल्याने भुजबळ यांच्या समोर शिवसेनेकडून येणाऱ्या निवडणुकीत मोठे आव्हान उभे केले जाणार असल्याचे चित्र या मेळाव्यातून दिसून आले

कार्यकर्त्यांना मास्कचा विसर

एकीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसैनिक मोठ्या संख्येत विना मास्क असल्याचे चित्र दिसून आलं. आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली गेल्याचं समोर आलं आहे.

काल खडाजंगी आज दिलजमाई

काल नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यात आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती. सुहास कांदे यांना छगन भुजबळ यांनीही त्याच पद्धतीने उत्तर देत सुनावलं होत..मात्र आज भुजबळ आणि कांदे यांच्यात जिल्हाधिकारी कार्यलयात बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे ही उपस्थित होते. पत्रकार परिषदेत भुजबळांच्या शेजारी बसलेल्या सुहास कांदे यांना जेव्हा माध्यमानी विचारलं असता आता कलगीतुरा थांबवा अस म्हणत भुजबळांनीच वादावर पडदा टाकला. त्यामुळे काल झालेली खडाजंगी आज मात्र शांत झाली..भुजबळांनीच संयमाची भूमिका घेत..तुमच्या आपत्कालीन निधी संदर्भात पुढे पाठपुरावा करू अस सांगत अखेर वाद शांत झाला. काल झालेल्या या बाचाबाचिची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होती..भुजबळ कांदे आमने सामने आल्याने अनेक राजकीय चर्चा देखील रंगल्या होत्या..मात्र आज त्या चर्चना पूर्णविराम मिळाला..

इतर बातम्या:

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दुसऱ्यांदा उघडले; 10264 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Shivsena organised meeting in the Yeola Assembly Constituency can gave challenge to Chhagan Bhujbal

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.