नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून […]

नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी
धरणाचे पाणी कांदा शेतीत सोडल्याने शेतीचे नुकसान
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 8:54 AM

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून या धरणातून पाणी सोडले नसल्याचे समजते.

धरणातील पाणी वाया

पाणी सोडण्याच्या गेटच्या गळतीच्या थोडेफार पाण्याचा वापर करून शेतकरी शेती पिकवतात, त्यामुळे धरणातील पाणी कमी झाले आहे. धरणात सध्या थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अज्ञातांनी धरणाचे पाणी सोडले

शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडे केल्याने रात्रभर पाणी धरणाखालील शेतात शिरले. यामध्ये भांडणे येथील शेतकरी सखाराम भोरू गायकवाड, शंकर कुवर व चंद्रकांत कुवर यांच्या कांदा पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादक अडचणीत

शेतकऱ्यांवर आधीचे मोठे संकट असल्याने दुसरे हे पाण्याचे संकट उभा राहिले आहे. कांद्याचा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने आमच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांदा पाण्यामुळे वाया जाणार

कळवण तालुक्यातील मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा दरवाजा रात्रीच्यावेळी ज्या अज्ञात व्यक्तीने उघडला आहे. त्याचा शोध घेण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतातील कांदा पाण्यामुळे वाया जाणार असल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.