AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबद्दलही स्पष्टपणे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अखेर ते या विषयावर स्पष्ट बोलले.

Sharad Pawar : लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, शरद पवार काय म्हणाले ?
| Updated on: Mar 22, 2024 | 12:20 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीला केलेल्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निषेध केला. केजरीवालांच्या अटकेची कारवाई चुकीची आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच राज्यातील राजकारणाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं. पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह शरद पवारांना केला जात होता. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार हे पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता, मात्र आता शरद पवार यांनीच यावर उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं.

यापूर्वीही शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आता आपण कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. राजकीय जीवनात 14 निवडणुका लढलो आहे. या सर्व निवडणुका मी जिंकलो आहे. आता आणखी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, असं ते म्हणाले.

माढ्याच्या जागेसाठी पवारांच्या मनात कोणता उमेदवार ?

माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील. महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल असं शरद पवार म्हणाले. तसेच, आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई चुकीची

या पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही भाष्य केलं. निवडणुकीच्या काळात भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.