Kolhapur Sharad Pawar : अयोध्येला कोण जातंय माहीत नाही, काल माझा नातूही जाऊन आला, कोल्हापुरात शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

पत्रकारांशी संवाद साधताना शगर पवार यांनी कोरेगाव भीमा, आगामी निवडणुका, नवनीत राणा, पेट्रोल-डिझेल दरवाढ आदी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. कोण अयोध्येला जाणार, मला माहीत नाही. आता माझा नातूही जाऊन आला अयोध्येला. त्यामुळे त्या विषयावर फारसे बोलण्याची गरज नसल्याचेच शरद पवार यावेळी म्हणाले.

Kolhapur Sharad Pawar : अयोध्येला कोण जातंय माहीत नाही, काल माझा नातूही जाऊन आला, कोल्हापुरात शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 9:49 AM

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा हा काही राजकीय विषय नाही. काल माझा नातूही अयोध्येत गेला होता, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लगावला आहे. त्यामुळे त्या विषयावर फारसे बोलण्याची गरज नाही नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते कोल्हापुरात बोलत होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोरेगाव भीमा, आगामी निवडणुका, नवनीत राणा, पेट्रोल-डिझेल दरवाढ आदी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. कोण अयोध्येला जाणार, मला माहीत नाही. आता माझा नातूही जाऊन आला अयोध्येला. त्यामुळे त्या विषयावर फारसे बोलण्याची गरज नसल्याचेच शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतली असून शक्तीप्रदर्शन करण्याच्या हेतून ते अयोध्या दौरा करणार आहे. यासाठीची तयारीही मनसेकडून जोरदार सुरू आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

कोरेगाव भीमा प्रकरणात राजद्रोह कलमाचा गैरवापर

कोरेगाव भीमा प्रकरणात राजद्रोह कलमाचा गैरवापर झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. देशद्रोह, राजद्रोह कलम कालम कालबाह्य झाले आहे. त्यामुळे केंद्राने त्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.

‘एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीत मतभेद’

15 दिवसांत निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश नाहीत. निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आहेत. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीत मतभेद आहेत. त्यामुळे एकत्र लढण्याबाबत चर्चा करून करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘केंद्र सरकार सामान्यांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही’

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यास त्याचा परिणाम फक्त वाहनचालकांना होत नाही, तर भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढतात. त्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणे गरजेचे आहे. मात्र केंद्रातले सरकार सामान्यांच्या या समस्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

‘राणा प्रकरण न्यायप्रविष्ट’

राणा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. असे नवनीत राणा प्रकरणावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. खूप काही बोलले तर नोटीस येईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा म्हणत याविषयावर कायदा-सुव्यवस्था निर्माण केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याविषयी पवारांना विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.