AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो… सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आज मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यातून केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो... सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं
| Updated on: Aug 16, 2024 | 3:42 PM
Share

महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात घालतानाच सरकारला चांगलंच फटकारलंय. विशेष करून राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणींची आठवण झाली नाही. पण निवडणुकीत पराभव होताच त्यांना बहिणींची आठवण झाली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजना आणली. हे सरकार म्हणतंय एक बहीण गेली तर काय झालं? दुसरी बहीण येईल. मला या भावांना सांगायचं, हे नातं 1500 रुपयाला विकाऊ नाही हो, असं सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दात सरकारला टोला लगावला. पण सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात चर्र झालं.

हा नात्याचा अपमान

आमच्या नात्याचा हा अपमान आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा अपमान आहे. मुळातच बहीण आणि भावाचं प्रेम असतं. त्याला किंमत लावली जात नाही. पण या सरकारने त्याला किंमत लावण्याचं पाप केलं आहे, असा जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. या सरकारने केवळ मतांसाठी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली आहे. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतो तर व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम आलं तर नातं अंगावर येतं आणि नात्यात व्यवसाय आला तर तिथे प्रेम राहत नाही, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी लगावला.

पैसे परत घेऊन दाखवाच

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर काढून घेणार असल्याचं विधान सत्ताधारी आमदार करत आहेत. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये लाडकी बहीण योजनेचे 10 हजार रुपये काढून घेतले जाणार आहेत. ज्या महिलांनी मतदान केलं नाही, त्यांचे पैसे परत घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही पैसे काढून तर दाखवाच… असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी केला.

90 दिवस कष्टाची परिकाष्ठा करा

यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट वाटप करण्याचं साकडं घातलं. कुणालाही तिकीट द्या. पण लवकरात लवकर जागा वाटप करा, कारण आपल्याला देशाचं आणि राज्याचं वातावरण बदलायचं आहे, असं त्या म्हणाल्या. गेली अडीच वर्ष खेळीमेळीच्या वातावरणात आपण काम केलं. आपल्याला अजूनही पुढची पाच वर्ष काम करायचे आहे. फक्त 90 दिवस सर्व काही बाजूला ठेवा आणि एकत्र या. या 90 दिवसात कष्टांची परिकष्टा करून दिल्लीसमोर न झुकणारं सरकार आणण्याची जबाबदारी आपली आहे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल