Omicron News Live Updates : ब्रिटन मध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 44 हजार नवे रुग्ण

Omicron latest Update | पुणे शहरात ओमिक्रॉनची बाधा असलेला एक रुग्ण आढळला आहे. तर पिंपरी चिचंवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचे तब्बल सहा रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच एकट्या पुणे जिल्ह्यात ओमिक्रॉनच्या एकूण सात रुग्णांची नोंद करण्यात आलीय.

Omicron News Live Updates : ब्रिटन मध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 44 हजार नवे रुग्ण
Omicron

Omicron Update  : राज्यात ओमिक्रॉन (Omicron) अर्थात कोरोनाचा प्रसार व्हायरला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला डोंबिवली (Dombivli) येथे आढळलेल्या या विषाणूची व्याप्ती आता पुणे जिल्ह्यापर्यंत (Pune District) पोहोचली आहे. पुणे शहरात ओमिक्रॉनची बाधा असलेला एक रुग्ण आढळला आहे. तर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचे तब्बल सहा रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच एकट्या पुणे जिल्ह्यात ओमिक्रॉनच्या एकूण सात रुग्णांची नोंद करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या जिल्ह्यात ओमिक्रॉनग्रस्त तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग आणि टेस्टिंग (Testing and Tracing) केले जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून केली जाईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Dec 2021 23:16 PM (IST)

  ब्रिटन मध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 44 हजार नवे रुग्ण

  ब्रिटन मध्ये कोरोनाचा कहर

  24 तासांत 44 हजार नवे कोरोना रुग्ण

  कोरोनामूळे 24 तासांत 54 जणांचा मृत्यू

 • 05 Dec 2021 22:30 PM (IST)

  12 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण ? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

  नवी दिल्ली : 12 ते 17 वयोगटातील मुलांना लसीकरण ?

  6 राज्यातील मुलांचे लसीकरण केले जाणार

  महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश राज्यात सुरुवातीला लसीकरण होणार

  पंजाब, झारखंड, बिहार मध्येही लहान मुलांना लसीकरण केले जाणार

  केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

 • 05 Dec 2021 21:40 PM (IST)

  नायजेरियातून कल्याणमध्ये आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण

  ठाणे : कल्याण नायजेरियातून आलेल्यार एका कुटुंबातील चार जणांना झाली होती करोनाची लागण

  या चौघांच्या संपर्कात आलेले आणखी चार जण करोना पॉझिटिव्ह

  यामध्ये डोंबिवलीतील दोन तर हैदराबादहून आलेल्या 2 जणांचा समावेश

  हैदराबादहून आलेले दोघे नागरिक हैदराबादला परतले

 • 05 Dec 2021 20:38 PM (IST)

  मुंबईत जोखीमपूर्ण देशातून उतरले 4227 प्रवासी, 19 जणांना कोरोनाची लागण

  मुंबई : उच्च जोखीम असलेल्या देशांतील एकूण मुंबई प्रवासी- 4227

  पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची संख्या – 19 (15 पुरुष, 4 महिला)

  काॅन्टॅक्ट ट्रेसिंग पॉझिटिव्ह – 6 (2 पुरुष, 4 महिला)

  सर्व रुग्णांना रुग्णालयात हलवले आणि नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी रवाना

 • 05 Dec 2021 20:35 PM (IST)

  ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताच पुणे जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क 

  पुणे : ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताच जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क

  ओमिक्रॉनबाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकाचं उद्यापासून केलं जाणार ट्रेसिंग आणि टेस्टिंग

  ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन, काल जिल्हा आरोग्य विभागानं बैठक घेऊन दिल्या सूचना

  उद्यापासून व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला होणार सुरुवात

  आरोग्य विभागाकडून कार्यवाहीला सुरुवात

  जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ . भगवान पवार यांची टीव्ही 9 ला माहिती

Published On - 8:32 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI