सोलापुरातील सिद्धेश्वर वन विहारातील अडीच लाखाच्या पोपटाचा मृत्यू

प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात परदेशी पक्षांना प्राणी संग्रहालयात ठेवलेच कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सप्तरंगी पोपटाच्या जोडीला सिद्धेश्वर वन विहारातील एका पिंजर्‍यात ठेवण्यात आले होते.

सोलापुरातील सिद्धेश्वर वन विहारातील अडीच लाखाच्या पोपटाचा मृत्यू
सोलापुरातील सिद्धेश्वर वन विहारातील अडीच लाखाच्या पोपटाचा मृत्यू

सोलापूर : सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात हैदराबाद येथून सात वर्षापूर्वी आणलेल्या सप्तरंगी पोपटांच्या जोडीचा मृत्यू झाला आहे. प्राणिसंग्रहालयातील दुरावस्था पाहून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मकाऊ पक्षांना सिद्धेश्वर वनविहारात ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दुर्दैवाने दहा दिवसांच्या अंतराने सप्तरंगी पोपटांच्या जोडीचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी 2016 मध्ये तब्बल अडीच लाख रुपये खर्चून मकाऊची जोडी आणण्यात आली होती. त्यानंतर छोट्या विविधरंगी परदेशी पक्षांचा मृत्यू झाला होता. (A pair of parrots two and a half lakh died at Siddheshwar Van Vihara in Solapur)

दम्यान प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात परदेशी पक्षांना प्राणी संग्रहालयात ठेवलेच कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सप्तरंगी पोपटाच्या जोडीला सिद्धेश्वर वन विहारातील एका पिंजर्‍यात ठेवण्यात आले होते. सध्या सोलापूर महानगरपालिकेकडून या पक्ष्यांच्या मृत्यू संदर्भात शोध घेतला जात आहे.

उद्यापासून महापालिका करणार लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी

उद्यापासून कारखान्यात, दुकानात जाऊन पालिकेचे अधिकारी कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी करणार आहेत. राज्य शासनाच्या मिशन कवच-कुंडल अभियानासाठी महापालिकेच्या टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. ज्या भागात कमी लसीकरण झाले त्या भागातील लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन जाण्याचे पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आवाहन केले आहे.

पंढरपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच गिड्डे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे. (A pair of parrots two and a half lakh died at Siddheshwar Van Vihara in Solapur)

इतर बातम्या

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

Mercury Remedies : बुधवारी हा उपाय केल्यास होईल बुध ग्रहाची कृपा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI