Chandrapur | 48 तासांच्या विश्रांतीनंतर चंद्रपूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू, प्रशासनाने नागरिकांना दिला सर्तकतेचा इशारा!
जिल्ह्यात आजवर वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 65 टक्के एवढा पाऊस पडलायं. तर मागील वर्षी या तारखेपर्यंत 50 टक्के इतक्याच पावसाची नोंद केली गेली होती. सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या वस्त्या व शहरांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं.

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) शहरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलीयं. आज सकाळपासूनच 48 तासांच्या विश्रांतीनंतर पावसाची रिपरिप सुरू झालीयं. चंद्रपूरच्या वर्धा नदीत विसर्ग होणाऱ्या लोअर वर्धा धरणाची 31 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सात मोठे सिंचन प्रकल्प (Irrigation projects)ओसंडून वाहात असल्याने नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढलीयं. गेल्या दहा दिवसांपासून चंद्रपूर शहर व जिल्ह्यात पूरस्थिती असल्याने आजच्या पावसानंतर (Rain) पुन्हा एकदा नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जातंय.
सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ
जिल्ह्यात आजवर वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 65 टक्के एवढा पाऊस पडलायं. तर मागील वर्षी या तारखेपर्यंत 50 टक्के इतक्याच पावसाची नोंद केली गेली होती. सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या वस्त्या व शहरांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. इतकेच नाही तर पुराच्या पाण्यात उतरू नका असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
48 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात
चंद्रपुरात सकाळपासून पाऊस सुरू आहे. 48 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस जास्त आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत 50 टक्के इतकाच पाऊस नोंदविला गेला होता. जोरदार पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
