पत्नी घरातून जात नाही म्हणून नराधम पतीने दिला विजेचा शॉक; नंदुरबारमधील मानवतेला काळिमा फासणारी घटना

या अमानुष घटनेत फिर्यादी लक्ष्मी पटले जखमी झाल्या होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, लक्ष्मी पटले यांनी तळोदा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीसह सासरा आणि नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नी घरातून जात नाही म्हणून नराधम पतीने दिला विजेचा शॉक; नंदुरबारमधील मानवतेला काळिमा फासणारी घटना
संग्रहित छायाचित्र.

नंदूरबार : पहिली पत्नी घरातून निघून जात नाही म्हणून दुसऱ्या पत्नीच्या मदतीने तिला वीजेचा शॉक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार येथे घडली आहे. लक्ष्मी पटले असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीसह अन्य दोघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. सासरा जयसिंग खर्डे, नवरा मुकेश जयसिंग खर्डे आणि त्याची दुसरी पत्नी गीता असं गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. (Attempt to kill wife by giving electric shock in Nandurbar)

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी लक्ष्मी पटले या महिलेचा मालदा येथील मुकेश जयसिंग खर्डे याच्यासोबत झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच लक्ष्मी आणि मुकेश यांच्यात खटके उडू लागले. यामुळे कौटुंबिक वादाला कंटाळून लक्ष्मी रागाने आपल्या माहेरी निघून गेल्या होत्या. दरम्यान, आरोपी मुकेश याने गीता नावाच्या अन्य एका महिलेसोबत दुसरा विवाह केला. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच, लक्ष्मी पुन्हा आपल्या सासरी आल्या. यामुळे मुकेश आणि लक्ष्मी यांच्यात वादाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत हा वाद सुरू होता. लक्ष्मीने घरातून जावे म्हणून महिलेचा पती मुकेश खर्डे, सासरा जयसिंग खर्डे आणि मुकेशची दुसरी पत्नी गीता यांनी मिळून लक्ष्मीला वीजेचा शॉक दिला.

या अमानुष घटनेत फिर्यादी लक्ष्मी पटले जखमी झाल्या होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, लक्ष्मी पटले यांनी तळोदा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीसह सासरा आणि नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात कौटुंबिक अत्याचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास तळोदा पोलीस करत आहेत.

मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत असतानाच पोलिसांनी कारवाई करीत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईहून गोव्याला रवाना होत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिला दलालांना विमानतळाजवळ अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अबरुन खान आणि वर्षा परमार अशी अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे आहेत. या महिला दलालांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

राजस्थानातून मुंबईत 21 कोटींच्या हिरॉईनची स्मगलिंग

गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. त्यानंतर एनसीबीनं मुंबईतल्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. तसेच एनसीबीच्या या धाडींमध्ये बराच मुद्देमाल जप्त केलाय. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहीम चालवली जात आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सप्लायर्सवर नजर ठेवली जात आहे. एका महिलेकडून 7 किलो हेरॅाईन जप्त करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय. (Attempt to kill wife by giving electric shock in Nandurbar)

इतर बातम्या

मध्यरात्री दुकान फोडलं, गल्ल्यात असतील तितके पैसे घेतले, हजारो रुपयांच्या सिगारेटचे पाकीटे पळवले, पण….

पत्नीचे इतरांशी संबंध, सासूने दोन नवऱ्यांना ठार मारलं, व्हिडीओत गंभीर दावे करत पतीची आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI