खामगावात 3 गाड्या एकमेकींवर आदळल्या, अपघातात तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ आज सकाळी 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव आणि बुलडाणाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खामगावात 3 गाड्या एकमेकींवर आदळल्या, अपघातात तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
Buldhana Accident

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ आज सकाळी 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव आणि बुलडाणाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला आहे. मालवाहू बोलेरो गाडी सोयाबीन पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या सुमो गाडीला धडकली तर बोलेरोच्या मागून सुद्धा भरधाव येणारी बोलेरो वाहन धडकून हा विचित्र अपघात घडला. यातील सर्व जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली. या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला

VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI