गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज (Desaiganj) तालुक्यात वाघाची दहशत आहे. वाघ गावात दिसताच नागरिकांनी जमा होऊन गोंधळ घातला. वाघाला हुसकावून लावले. परिसरात वाघाची दहशत आहे. गावालगतच्या झुडपी जंगलात (Shrub Forest) वाघ असल्याची माहिती समजली. गावकरी वाघाला पहायला तिथं जमा झाले. वनविभाग कमर्चारी पोलीसही पोहचले. अखेर वाघ दिसताच नागरिकांनी चारही बाजूने आरडाओरडा सुरु केला. नागरिकांचा गोंधळ ऐकताच वाघ झुडपाच्या बाहेर पडला. अखेर नागरिकांनी जोरात कल्ला सुरु केला. वाघ पहायला लागला. अखेर वाघाच्या मागे नागरिक वाघ पुढे असे चित्र काही वेळेपुरतं तयार झालं मात्र, नागरीकांच्या गोंधळाने वाघ जंगलात पळून (Tiger Run) गेला.