गाव कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

गाव कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
राजेश टोपे

जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही घोषणा टोपे यांनी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 12, 2021 | 7:47 PM

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत लसीकरण गतीने करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. तसेच जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही घोषणा टोपे यांनी केली. (Jalna administration will give award to grama panchayat who make themselves free from corona said Rajesh Tope)

जालना जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार

जालना जिल्ह्यातील सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या तपासणीवेळी 80 टक्के गुण हे लसीकरणसाठी, 10 टक्के गुण हे आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणीसाठी तर 10 टक्के गुण हे कोविड-19 च्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराचे पालन या बाबींचे कटाक्षाने पालन करण्यासाठी देण्यात येणार आहेत.

बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन या प्रमाणे 24 ग्रामपंचायतीची व जिल्हास्तरावर एक अशा एकूण 25 ग्रामपंचातीची निवड करण्यात येणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींना 15 ऑगस्ट रोजी बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

पॉझिटिव्हीटी रेट वाढू नये यासाठी काळजी घ्यावी

जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होताना दिसत असून त्याची संख्या वाढविण्याची गरज आहे. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात, असे निर्देश राजेश टोपे यांनी दिले. तसेच जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे असेही राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोव्हिडची लक्षणे असतील तर प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

सीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे. जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी. जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करण्यात येऊन सातही दिवस लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे, असेही टोपे म्हणाले. तसेच लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय, उप विभागीय कार्यालयांनी हिरिरीने सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

कोरोना नियमांचे पालन होत आहे का ते पाहावे

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी 5 वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे. लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.

इतर बातम्या :

“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती

कष्ट करतो आणि सन्मानाने जगतो, रिक्षात राहिलेले 1 लाख रुपये प्रवाशाला परत, रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचं दर्शन

(Jalna administration will give award to grama panchayat who make themselves free from corona said Rajesh Tope)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें