AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थक भडकले, थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत.

VIDEO: शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थक भडकले, थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक
ncp workers
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:55 AM
Share

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलेलं आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदेंना हा पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप करत शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

शिंदेंना गाफील ठेवलं

शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीची धुरा हाती घेतली तेव्हापासून ते निष्ठेने काम करत आहेत. शिंदे जिल्ह्याचं नेतृत्व ताकदीने करत असल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच त्यांचा पराभव घडवून आणला आहे. पक्षाचे नेते शरद पवार आणि अजित पवारांनी सांगूनही शिंदे यांना गाफिल ठेवलं गेलं. त्यांना अडचणीत आणून पराभूत करण्यात आलं. यामागे स्थानिक नेतृत्वाची खेळी आहे, असा संताप या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

घोषणाबाजीने परिसर दणाणला

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शशिकांत शिंदे आगे बढो, राष्ट्रवादीचा विजय असोच्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

पक्षाची माफी मागतो

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. पराभव खिलाडी वृत्तीने मान्य करावा लागतो. तो मी मान्य केला आहे. हार-जीत होत असते. पक्षाने प्रयत्न केले. पण एका मताने पराभूत झालो. परत जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यामुळे समर्थकांकडून काही गैरप्रकार झाला असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. कार्यकर्ते भावनावश होतात. त्यातून हा प्रकार घडला असेल. त्यामुळे मी पक्षाची माफी मागतो, असं सांगतानाच विधानसभेला मी पराभूत झाल्यानंतर पक्षाने मला विधान परिषदेचं तिकीट दिलं होतं, असंही शिंदे यांनी सांगितलं. तसेच 25 तारखेला पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर व्यवस्थित बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक

Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.