सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराची थेट नरेंद्र मोदींकडे तक्रार, सोमय्यांना लक्ष घालण्याची विनंती, नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून या बाबत चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती तक्रारदार,स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराची थेट नरेंद्र मोदींकडे तक्रार, सोमय्यांना लक्ष घालण्याची विनंती, नेमकं प्रकरण काय?
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक


सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून या बाबत चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती तक्रारदार,स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. तसेच ही तक्रार आणि इतर पुरावे घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळयाबाबत सांगलीला भेट देण्याची मागणी करणार असल्याचा फराटे यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय दबावातून चौकशीचा फार्स

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचार आणि घोटाळयांच्या तक्रारी बाबत नुकतेचे राज्य सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले होते.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक व शिराळयाचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, चौकशी सुरू असताना सहकार विभागाकडून अचानक या चौकशीला स्थगिती देण्यात आली. मात्र राजकीय दबावातून या चौकशीचे फार्स करण्यात आला आणि पुन्हा त्याला स्थगिती देण्यात आली असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सराटे यांनी केला.

सुनील फराटेंची नरेंद्र मोदींकडे धाव

सुनील फराटे यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे.बँकेतील झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे सुनील फराटे यांनी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून ही तातडीने घेण्यात आली आहे. संबंधित तक्रारीच्या चौकशीसाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व तक्रारदार सुनील सराटे यांनी दिली आहे.

किरीट सोमय्यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाखल करण्यात आलेली तक्रार आणि बँकेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत असणारे पुरावे घेऊन आपण भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांची लवकरच भेट घेणार आहे. बँकेच्या कारभाराचा त्यांच्यासमोर पंचनामा करून, या प्रकरणी ईडी चौकशी बाबतीत मागणी करून त्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाहणी करण्यासाठी किरीट सोमैया यांना सांगलीला येण्याची विनंती करणार असल्याचं फराटे यांनी स्पष्ट केले आहे.

एका बाजूला राज्य सरकारकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला स्थगिती दिली आहे,मात्र सुनील फराटे यांनी थेट पंतप्रधानांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकार आता यामध्ये काय भूमिका घेणार ,याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मात्र थेट पंतप्रधानांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणीत वाढ होणार आहे.

इतर बातम्या:

आठवड्यात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेणार, मदतीसाठी डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांचा शब्द

दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू; अजित पवारांचं सूचक विधान

 

Sunil Farate complaint Sangli District Co operative Bank scam to Narendra Modi also contact Kirit Somaiya

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI