‘पवारसाहेब हॅट्स ऑफ’, पंकजांकडून जाहीर कौतुक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचं आणि कामाच्या तडफेचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कौतुक केलं आहे.

'पवारसाहेब हॅट्स ऑफ', पंकजांकडून जाहीर कौतुक
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 10:18 PM

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचं आणि कामाच्या तडफेचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कौतुक केलं आहे. पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं ट्विट करत पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे. (Pankaja Munde Appriciate Sharad Pawar)

शद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत. पवारांच्या कामाचं कौतुक करताना पक्ष आणि विचार वेगळे असतात, असं सांगताना त्यांनी मुंडे साहेबांच्या शिकवणाची पुष्टी जोडली.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच बैठकीवेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट

पुण्यात पार पडलेल्या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. तब्बल वर्षभरानंतर पंकजा आणि धनंजय आमनेसामने आले होते. दोघांची वर्षभरानंतर भेट झाली. या भेटीदरम्यान काही वेळ पंकजा-धनंजय यांच्यात चर्चा झाली.

तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला. ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहिण-भाऊ एकत्र आले.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. गेल्या दोन महिन्यापासून ऊसतोड मजुरांच्या वाढीव दरवाढीचा प्रश्न गाजत होता. हा प्रश्न तूर्तास निकाली निघाला.

(Pankaja Munde Appriciate Sharad Pawar)

संबंधित बातम्या

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.