PCMC Election Results 2026 LIVE : गड राखण्यासाठी भाजपाची पराकाष्ठा, प्रभाग क्रमांक 9 ते 11

Pimpri Chinchwad PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. शेवटी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली.

PCMC Election Results 2026 LIVE : गड राखण्यासाठी भाजपाची पराकाष्ठा, प्रभाग क्रमांक 9 ते 11
Pimpri Chinchwad Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:45 AM

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्यात 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. राज्यातील बदलेली राजकीय समीकरणे या निवडणुकीत बघायला मिळाली. अनेक प्रस्थापितांना फटका बसला. भाजपा, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी दोन्ही गटांनी ही निवडणूक लढवली. दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा होत्या. 2017 च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता बघायला मिळाली. मात्र, निवडणुकीच्या अगोदर अनेक बड्या नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकला. याचा थेट परिणाम बघायला मिळतोय.

पिंपरी चिंचचड महापालिका प्रभाग क्रमांक 9 मासूळकर कॉलनी, खराळवाडी, नेहरूनगर,  गांधीनगर झोडपट्टीपर्यंत आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व बघायला मिळते. मोठी ताकद राष्ट्रवादीची आहे. प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 40 हजार 18 एवढी आहे तर यामध्ये अनुसूचित जातीचे 3 हजार 489 एवढे मतदार आहेत. अनुसूचित जमातीचे 1 हजार 135 असे मतदार आहेत.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

2017 च्या निवडणुकीमध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाची विजयी झाली. मात्र, यंदा दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या. 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाचे वर्चस्व बघायला मिळाले. मोरवाडी, शाहूनगर आणि संभाजीनगर याठिकाणी भाजपाचे वर्चस्व राहिले. 39 हजार 802 एवढी मतदार संख्या प्रभाग 10 मध्ये आहे. यामध्ये अनुसुचित जाताचे मतदार हे 2 हजार 796 एवढे आहेत तर अनुसुचित जमातीचे 784 एवढे आहेत.

बालाजीनगर, इंद्रायणीनगर, गवळीमाथा, सावतामाळी मंदीर रस्ता, विठोबा बनकर पथ, लांडेवाडी चौक, पवना क्रांती चौकपर्यंत प्रभाग क्रमांक 11 आहे. प्रभाग 11 मधील लोकसंख्या 37 हजार 360 असून यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 8908 तर अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 622 आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे वर्चस्व साधारणपणे बघायला मिळते. यंदा चारही नगरसेवक आपलेच निवडून आणण्यासाठी भाजपाकडून तारेवरची कसरत केली जात आहे. यंदा मात्र प्रभाग पूर्ण समीकरणे बदलली आहेत.

 

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE