
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार राज्यात 15 जानेवार 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या निवडणुकींचे काही वेळात निकाल हाती येतील. पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017 मध्ये भाजपाची एकहाती सत्ता बघायला मिळाली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण गणिते बिघडली असून भाजपाचे काही नेते अजित पवार गटात सहभागी झाले. राज्यभरात अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांच्या विरोध आहे. मात्र, फक्त पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही एनसीपी एकत्र येत निवडणुका लढताना दिसले. प्रत्येक पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेसाठी दावा करण्यात आला. अनेक प्रभागात भाजपासमोर यंदाच्या निवडणुकीत मोठे आव्हान पुढे राहिले. आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी यंदाच्या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.
दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे देखील आपली ताकद लावताना दिसले. राज्याच्या राजकारणात मुंबईइतकेच महत्त्व असलेल्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari-Chinchwad Municipal Corporation)ही तितकीच महत्वाची आहे. प्रभाग क्रमांक 31 च्या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष होते. प्रभाग क्रमांक 31 मध्ये एकून मतदारांची संख्या 39068 आहेत, त्यापैकी अनुसूचित जाती 4453 अनुसूचित जमाती 450 इतके.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डेनगर, विद्यानगर भाग, ऊरो रुग्णालय आदी विभागांचा वॉर्ड क्रमांक 31 मध्ये समावेश होतो. विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत चारही नगरसेवक हे भाजपाची निवडून आले. एकहाती सत्ता या प्रभागात फक्त आणि फक्त भाजपाची बघायला मिळाली. यंदाही मोठी कस लागणार आहे.
वॉर्ड क्रमांक 32 भाजपच्या सुरक्षेत वॉर्डपैकी एक आहे. त्यामुळे भाजपाला पराभूत करण्याचे मोठे आव्हान विरोधकांपुढे आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्ये एकून मतदारांची संख्या ही 33584 तर अनुसूचित जाती 5701 अनुसूचित जमाती 340 आहे. तापकीर नगर, रहाटणी, ज्योतिबा नगर, सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, जयमालानगर, संगमनगर, पी.डब्ल्यु.डी. कॉलनी, एस.टी.कॉलनी, कृष्णानगरपर्यंत प्रभाग येतो. विशेष म्हणजे प्रभाग 32 मध्ये चारही नगरसेवक हे 2017 च्या निवडणुकीत भाजपाचेच निवडून आले.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE